Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सराईत गुन्हेगारांवर ‘अ‍ॅक्शन’! १६ जणांना थेट न्यायालयीन कोठडी; अप्पर पोलीस अधीक्षकांनी दाखवली कठोरता… श्रीरामपूर, संगमनेर, लोणी, कोपरगाव, राहुरीतील आरोपींचा समावेश
गुन्हेगारी

सराईत गुन्हेगारांवर ‘अ‍ॅक्शन’! १६ जणांना थेट न्यायालयीन कोठडी; अप्पर पोलीस अधीक्षकांनी दाखवली कठोरता… श्रीरामपूर, संगमनेर, लोणी, कोपरगाव, राहुरीतील आरोपींचा समावेश

नवीन कायद्यानुसार अपर पोलीस अधीक्षक यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची राज्यातील एवढी मोठी पहिलीच कारवाई असावी.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 14, 2025Updated:November 14, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.अपर पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर चाललेल्या महत्त्वाच्या ‘चॅप्टर केसेस’च्या सुनावणीनंतर तब्बल १६ गैरअर्जदार/प्रतिवादींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अपर पोलीस अधीक्षकांना सरकारकडून कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यानुसार अपर पोलीस अधीक्षक तथा दंडाधिकारी यांच्यासमोर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ ते १२९ खालील ‘चॅप्टर केसेस’चे कामकाज चालते. यात प्रामुख्याने चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र घेणे आणि समाजविघातक व्यक्तींकडून हमीपत्र घेण्याची कारवाई केली जाते.

या १६ व्यक्तींवर करण्यात आलेल्या कारवाईमागे दोन प्रमुख कारणे आहेत, यामुळे त्यांच्यावर कठोर पाऊल उचलण्यात आले. काही गैरअर्जदारांनी पूर्वी ‘चांगल्या वर्तणुकीचे’ बंधपत्र दिले होते. मात्र, बंधपत्राच्या कालावधीतच त्यांनी पुन्हा गुन्हेगारी कारवाया करून या बंधपत्राचे उल्लंघन केले. तर कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढे बंधपत्र देण्यासाठी योग्य व सक्षम जामीनदार हजर करण्यात काही प्रतिवादींनी कसूर केली. नियमानुसार जामीनदार हजर न केल्यास त्यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाते.

कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर BNSS कलम १२९ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आले होते. श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे आणि शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या समन्वयातून ही कारवाई झाली.

सुनावणी अंती न्यायालयीन कोठडीत पाठवलेल्या १६ गुन्हेगारांमध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांतर्गत ५, संगमनेर शहर, कोपरगाव शहर व लोणी पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी ३, राहुरी पोलीस ठाण्यांतर्गत २ जणांचा समावेश आहे.

या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, आगामी काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा गुन्हेगारांविरुद्ध अतिशय प्रभावी वापर प्रथमत:च करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार अपर पोलीस अधीक्षक यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची राज्यातील एवढी मोठी पहिलीच कारवाई असावी. 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,490
कोठडी गुन्हेगारी सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.