Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाणीप्रश्नी संगमनेर ‘सुपरहिट’! ‘थोरातांनी काय केलं?’ विचारणाऱ्यांना कोपरगावातील फलकांनी दिलं उत्तर… संगमनेरमध्ये दिवसातून दोन वेळा पाणी येतं, जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही?
राजकारण

पाणीप्रश्नी संगमनेर ‘सुपरहिट’! ‘थोरातांनी काय केलं?’ विचारणाऱ्यांना कोपरगावातील फलकांनी दिलं उत्तर… संगमनेरमध्ये दिवसातून दोन वेळा पाणी येतं, जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही?

कोपरगावातील फलकांमुळे या योजनेची पुन्हा उजळणी झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

“संगमनेरमध्ये दररोज दिवसातून दोन वेळा पाणी येतं, जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही?” कोपरगाव शहरात लागलेल्या या थेट फलकांनी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू केली आहे. राजकारणात अनेकदा ४० वर्षात काय केलं, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातो. मात्र, संगमनेरच्या पाणी प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करणाऱ्या आणि शहराला ‘टँकरमुक्त’ करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या कार्याची पोचपावती खुद्द कोपरगावच्या नागरिकांनीच दिल्याचं चित्र आहे. यामुळे संगमनेरची ही अभूतपूर्व पाणी योजना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

संगमनेर म्हणजे ‘पाण्याची राजधानी! – महाराष्ट्रातील अनेक शहरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रात्री-अपरात्री पाणी येणं, मातीमिश्रित किंवा अस्वच्छ पाणी मिळणं ही समस्या नित्याची आहे. मात्र, संगमनेर शहर याला अपवाद आहे. केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील काही मोजक्या शहरांपैकी संगमनेर हे एकमेव शहर आहे, जिथे उन्हाळ्यातही दररोज दोन वेळा पूर्ण दाबाने शुद्ध पाणी उपलब्ध होते. शहरीकरणात पाण्याची उपलब्धता हा सर्वात महत्त्वाचा घटक असताना, संगमनेरची ही स्वयंपूर्णता राज्यासाठी एक आदर्श ठरली आहे.

बाळासाहेब थोरात यांची दूरदृष्टी आणि मुख्यमंत्री विलासरावांचे सहकार्य – संगमनेर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याची कल्पना १९९९ साली तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांची होती. त्याच काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली होती. थोरात यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उपयोग करून घेतला. त्यांनी शिवकालीन पाणी योजनांच्या धर्तीवर, गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने निळवंडे धरणातून थेट पाईपलाइनद्वारे पाणी शहरात आणण्याची प्रशासकीय मंजुरी मिळवली आणि तातडीने कामाला सुरुवात केली. २०२१ मध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकल्पाला आणखी अद्ययावत करण्यासाठी २३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवली, जेणेकरून भविष्यातही शहराला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळत राहील.

या ऐतिहासिक निर्णयामुळे आज संगमनेर शहरात चोवीस तास शुद्ध पाण्याची उपलब्धता आहे. कोपरगावातील फलकांमुळे या योजनेची पुन्हा उजळणी झाली आहे.


  • ‘बिगर-मोटार’ पाणीपुरवठा: अशी आहे योजना – संगमनेरची ही पाणी योजना तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी आहे.
  • उगमावर व्हॉल्व्ह: निळवंडे धरणाच्या भिंतीच्या तळाशी संगमनेरसाठी एक स्वतंत्र व्हॉल्व्ह बसवण्यात आला आहे.
  • गुरुत्वाकर्षण शक्ती: निळवंडे ते अकोले अशी ३८ किलोमीटर लांबीची पाईपलाइन उताराच्या साहाय्याने टाकण्यात आली आहे. यामुळे पाणी कोणत्याही पंपाशिवाय (मोटारशिवाय) थेट संगमनेर शहरात पोहोचते.
  • आधुनिक वितरण व्यवस्था: शहरात जुन्या पाईपलाइन काढून त्याऐवजी बिडाच्या आधुनिक पाईपलाइन बसवण्यात आल्या आहेत.
  • घरोघरी पाणी: आज सात टाक्यांद्वारे दररोज सुमारे एक कोटी लिटर शुद्ध पाणी थेट नागरिकांच्या घरात पोहोचते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुसऱ्या मजल्यापर्यंतही नागरिकांना मोटार न वापरता पाणी मिळते.
  • शुद्ध पाण्याची हमी – केवळ दररोज पाणी मिळणे पुरेसे नाही, ते शुद्ध असणेही आवश्यक आहे. संगमनेर शहरात नागरिकांना शुद्ध पाण्याची हमी देण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यरत आहे. २०२१ मध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकल्पाला आणखी अद्ययावत करण्यासाठी २३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवली, जेणेकरून भविष्यातही शहराला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळत राहील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,629
कोपरगाव फलक निळवंडे पाणी योजना बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar नेवासा / श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक…

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.