Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक कोटी रोख रक्कम जप्त! संगमनेरमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत ‘कॅश’ची बॅग पकडली, तपासणी नाक्यावर कारवाई; ‘अजमेरा कन्स्ट्रक्शन’ कंपनीची रक्कम असल्याचा प्राथमिक दावा
निवडणूक

एक कोटी रोख रक्कम जप्त! संगमनेरमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत ‘कॅश’ची बॅग पकडली, तपासणी नाक्यावर कारवाई; ‘अजमेरा कन्स्ट्रक्शन’ कंपनीची रक्कम असल्याचा प्राथमिक दावा

संबंधित रक्कम कुठे जमा करायची आणि पुढील कारवाई काय करायची, याबाबत वरिष्ठांकडून सूचना प्राप्त न झाल्याने कारवाईला विलंब झाला आणि त्यांना आदेशाची प्रतीक्षा करावी लागली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2025Updated:15/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत, संगमनेर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नेमलेल्या स्थायी सर्वेक्षण पथकाने (SST) जुन्या महामार्गावरील तपासणी नाक्यावर एका कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१५ नोव्हेंबर २०२५) दुपारच्या सुमारास खांडगावनजीकच्या तपासणी नाक्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली. रायतेवाडीकडून संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (क्र. MH 25 AS 8851) कारची तपासणी करत असताना, पथकाला एका बॅगेत ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असलेली एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली.
निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. निवडणुकीच्या काळात एवढी मोठी रोकड आढळल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली.
कारमधील दोन व्यक्तींकडे एवढ्या मोठ्या रकमेबद्दल विचारणा केली असता, त्यांना तातडीने कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. मात्र, प्राथमिक चौकशीत त्यांनी ही रक्कम धाराशिव येथील ‘अजमेरा कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम कंपनीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कंपनीचे काम ‘जय साई कंट्रक्शन’ मार्फत सुरू असून, निळवंडे धरणाच्या कालव्याचे (कॅनॉल) काम सुरू असल्याने, ही रक्कम कामावरील मजुरांचा पगार आणि वाहनांसाठी डिझेल खरेदी करण्यासाठी घेऊन जात असल्याचे चालकाने व त्याच्या सहकाऱ्याने पोलिसांना सांगितले.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, आणि पोलीस कर्मचारी विवेक जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या रकमेचा निवडणुकीशी थेट संबंध नसल्याचे सध्या दिसून येत आहे. मात्र, भरारी पथक कारमधील व्यक्तींच्या म्हणण्याची सत्यता आणि रकमेच्या स्त्रोताची सखोल पडताळणी करत आहे. रक्कम पकडल्यानंतर पोलीस आणि भरारी पथकाचे अधिकारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत घटनास्थळीच अडकून पडले होते. संबंधित रक्कम कुठे जमा करायची आणि पुढील कारवाई काय करायची, याबाबत वरिष्ठांकडून सूचना प्राप्त न झाल्याने कारवाईला विलंब झाला आणि त्यांना आदेशाची प्रतीक्षा करावी लागली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,947
कॅश पकडली नगरपरिषद निवडणूक भरारी पथक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.