Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना: मंत्री विखे पाटील
राजकारण

बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना: मंत्री विखे पाटील

आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या ४५ वर्षांत जे प्रश्न सुटले नाहीत, ते प्राधान्याने सोडवण्याचे काम सुरू आहे. त्यांनी ४० वर्षांत निधी न आणता आता खोटे श्रेय घेणाऱ्यांवर टीका केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती दिली.
डिग्रस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, सरपंच अशोक खेमनर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, बिबट्यांकडून हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आणि अनेक विद्यार्थी लांबून एकटे येत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर, त्यांनी स्थानिक पातळीवर लांबच्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था करणे आणि ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
त्यांनी शाळा इमारतीच्या कामाचे कौतुक केले, मात्र ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली. तालुक्यात खताळ यांच्या माध्यमातून विकासकामे सुरू असून, जनतेने विकासासाठी परिवर्तन केले आहे.
यावेळी त्यांनी पाणीप्रश्नावर भाष्य करताना सांगितले की, निळवंडे धरणाचे पाणी आल्याने जिरायती भागाला दिलासा मिळाला असून, डिग्रस गावालाही या पाण्याचा लाभ कसा देता येईल, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राजकीय भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकार लोकहिताचे निर्णय घेत आहे. अतिवृष्टीची सुमारे २३ कोटी रुपयांची मदत तालुक्याला मंजूर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता बनत असून, बिहार निवडणुकीच्या निकालाने जनता विकासाच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या ४५ वर्षांत जे प्रश्न सुटले नाहीत, ते प्राधान्याने सोडवण्याचे काम सुरू आहे. त्यांनी ४० वर्षांत निधी न आणता आता खोटे श्रेय घेणाऱ्यांवर टीका केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 640
बिबटे बिबटे हल्ले राधाकृष्ण विखे शाळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar नेवासा / श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक…

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.