Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १० कोटींच्या मानहानी दाव्याचा ‘बॉम्ब’: म्हाळुंगी पुलाच्या वादावरून सत्यजीत तांबे आक्रमक, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखांना चार दिवसांची मुदत! संगमनेरच्या राजकारणात खळबळ
राजकारण

१० कोटींच्या मानहानी दाव्याचा ‘बॉम्ब’: म्हाळुंगी पुलाच्या वादावरून सत्यजीत तांबे आक्रमक, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखांना चार दिवसांची मुदत! संगमनेरच्या राजकारणात खळबळ

आमदार तांबे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संगमनेरच्या स्थानिक राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून, हा वाद माफी येते की थेट न्यायालयीन संघर्षाकडे वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – म्हाळुंगी पुलाच्या कामातील अडथळ्यांवरून सुरू झालेल्या वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवून १० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

१५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित बातमीत सूर्यवंशी यांनी तांबे यांच्यावर काँग्रेस पुरस्कृत आमदाराने म्हाळुंगी पुलाचे काम रखडवले, असा गंभीर आरोप केला होता. या संपूर्ण आरोपाला पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा ठरवत आमदार तांबे यांनी सूर्यवंशी यांना चार दिवसांत आरोप सिद्ध करण्याची किंवा बिनशर्त माफी मागण्याची मुदत दिली आहे.

अ‍ॅड. अमोल कारभारी घुले यांच्यामार्फत पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये तांबे यांनी स्पष्ट केले आहे की, म्हाळुंगी पुलासाठी लागणारा वसंपूर्ण निधी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच मंजूर केला होता; शिवसेना किंवा त्यांच्या नेत्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यांनी पुढे खुलासा केला की, नाटकी नाल्याच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला निधी नगरपालिकेने पुढे व्यावसायिक संकुलाकडे वळवला आणि नंतर तोच निधी पुन्हा वळवून म्हाळुंगी पुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे तांबे यांच्यावर पुलाचे काम रखडवण्याचा आरोप करण्यास कोणताही आधार नाही.

आमदार तांबे यांनी नोटीसमध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, ते पूर्णपणे अपक्ष म्हणून निवडून आलेले असून त्यांनी विधानपरिषदेत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले नाही. याउलट, आरोप करणाऱ्यांचे ज्येष्ठ नेते कधी त्यांना भाजपचे, तर कधी काँग्रेसचे असल्याचे म्हणतात; ही विधाने गोंधळलेल्या अवस्थेत आणि अज्ञानाने केलेली असून, यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे तांबे यांनी नमूद केले आहे.

नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सूर्यवंशी यांच्या या खोट्या माहितीमुळे आमदार तांबे यांची सार्वजनिक प्रतिमा खराब झाली आहे आणि यामुळे कायद्यांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता – कलम ३५२, ३५३, २०६ अन्वये तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, कलम ६६(D) या सर्व तरतुदींनुसार सूर्यवंशी यांच्या विरोधात १० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा तसेच गुन्हा नोंदविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सूर्यवंशी यांनी चार दिवसांच्या आत दोन लायक साक्षीदारांच्या उपस्थितीत लेखी माफी मागावी तसेच त्याला वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या मुदतीत माफी न मिळाल्यास, कायदेशीर पर्याय अवलंबणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार तांबे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संगमनेरच्या स्थानिक राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून, हा वाद माफी येते की थेट न्यायालयीन संघर्षाकडे वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,651
नोटीस न्यायालय विनोद सूर्यवंशी सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.