Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उरले काही तास, रविवारी सुट्टीच्या दिवशी 13 उमेदवारांचे अर्ज दाखल; अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत महायुती-महाविकास आघाडीचे पत्ते गुलदस्त्यात!
निवडणूक

पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उरले काही तास, रविवारी सुट्टीच्या दिवशी 13 उमेदवारांचे अर्ज दाखल; अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत महायुती-महाविकास आघाडीचे पत्ते गुलदस्त्यात!

दोन्ही आघाड्या एकमेकांच्या उमेदवारांचा अंदाज घेत असल्याने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2025Updated:16/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी (दुपारी तीन वाजेपर्यंत) असल्याने आता अवघे काही तास उरले आहेत.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी सात अर्ज दाखल झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, रविवार सुट्टीचा दिवस असूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, आणि या दिवशी १३ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. यामुळे आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीचे ‘वेट अँड वॉच’ – सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे, अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणापर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्ही प्रमुख पक्षांच्या कोणत्याही अधिकृत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले नाहीत. दोन्ही पक्षांकडून आपली उमेदवारी कुणाला मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन्ही आघाड्या एकमेकांच्या उमेदवारांचा अंदाज घेत असल्याने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जात आहे.

महाविकास आघाडी ‘शहर विकास’ किंवा अन्य आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने, महायुतीची रणनीती महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीनेही अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार आता सोमवारी, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अंतिम क्षणी आपले अर्ज दाखल करण्याची चिन्हे आहेत.

जागा वाटपाचे संभावित चित्र (सूत्रांनुसार) – फाटाफूट टाळण्यासाठी आणि दक्षता म्हणून दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची यादी अंतिम असूनही, ती जाहीर केली जात नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील जागा वाटपाच्या संभाव्य सूत्रानुसार, नगराध्यक्षपद शिवसेनेला आपल्याकडे ठेवण्यात यश आले आहे. नगरसेवक जागांसाठी शहरातील जागा भारतीय जनता पक्ष तर उपनगरातील जागा शिवसेना लढवणार आहे. यासोबतच शहर आणि उपनगरात राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा सोडली जाणार आहे. विशेषतः मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये महायुती चिन्हावर निवडणूक न लढता अपक्ष उमेदवार देण्याची माहिती समोर येत आहे. तथापि, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रविवारी दाखल झालेले १३ उमेदवारी अर्ज – दरम्यान, रविवारी दाखल झालेल्या १३ उमेदवारी अर्जांमध्ये खालील इच्छुकांचा समावेश आहे:

अश्विनी सतीश ढोले (प्रभाग १ अ), गोरे प्रसाद ज्ञानदेव (प्रभाग ७ ब), शेख असिफ इलियास (प्रभाग ८ ब), शेख सायरा इलियास कुरेशी (प्रभाग ९ ब), कुरेशी हुरबानो गुलामसाबीर, शेख फैरोजा इलियास आणि शेख दिलशाद अजीज (तिन्ही प्रभाग १० अ), इनामदार एजाज जमील (प्रभाग १० ब), कुरेशी रशिदाबी अब्दुल करीम (प्रभाग ११ अ), शेख शहबाज गफार (प्रभाग ११ ब), सौदागर इम्रान सत्तार व मोमिन जैद जुनेद (दोन्ही प्रभाग १५ अ) आणि शेख दिलशाद अजीज (प्रभाग १५ ब).

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,807
उमेदवारी अर्ज दयानंद गोरे संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.