Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026

आज, शुक्रवार ३१ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 31, 2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर हादरले! डॉ. भानुदास डेरे यांचा ‘हिंसक’ कौटुंबिक वाद, थेट हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये गाडी घुसवली; मुलीच्या तक्रारीवरून अटक
गुन्हेगारी

संगमनेर हादरले! डॉ. भानुदास डेरे यांचा ‘हिंसक’ कौटुंबिक वाद, थेट हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये गाडी घुसवली; मुलीच्या तक्रारीवरून अटक

वडिलांच्या राजकीय वलयाची पर्वा न करता त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉ. भानुदास गेणूजी डेरे (रा. घोडेकरमळा, ता. संगमनेर) आणि पी.ए. सोमनाथ पवार यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर तक्रार दाखल केली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 19, 2025Updated:November 19, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शहरातील नामांकित संजीवन हॉस्पिटलचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक नेते डॉ. भानुदास डेरे यांनी कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक कृत्य केले आहे. मुलीने पत्नीला सपोर्ट केल्याचा राग मनात धरून डेरे यांनी आपल्या पी.ए. सोमनाथ पवार यांच्यासह थेट फाॅर्च्युनर गाडी हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये वेगाने घुसवली, काचेचा दरवाजा तोडला आणि एका कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो तरुण बचावला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून, डॉ. डेरे यांच्याच कन्या डॉ. एकता वाबळे यांनी वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर डॉ. डेरेना गंभीर कलमांखाली तात्काळ अटक करण्यात आली आहे.

ही धक्कादायक घटना मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास संगमनेर येथील गुंजाळवाडी परिसरातील संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे घडली.

सविस्तर माहितीनुसार, डॉ. भानुदास डेरे आणि त्यांची पत्नी विभक्त राहतात. त्यांची कन्या डॉ. एकता वाबळे या आईला सपोर्ट करतात, तसेच त्या हॉस्पिटलचे कामकाज पाहतात. याचा राग डॉ. डेरे यांच्या मनात होता. डेरे हे गेली अनेक वर्षे डॉ. वाबळे यांना धमक्या देऊन हॉस्पिटल खाली करण्यास भाग पाडत होते.

दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:२० च्या सुमारास डॉ. एकता वाबळे हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना, अचानक काचा फुटल्याचा मोठा आवाज आला. हॉस्पिटल स्टाफने खाली धाव घेऊन डॉ. वाबळे यांना माहिती दिली. डॉ. वाबळे यांनी खाली येऊन पाहिलं असता, ग्राउंड फ्लोअरवरील वेटिंग रूममध्ये पांढऱ्या रंगाची एम. एच. १७ डी. जे. १४१९ क्रमांकाची फाॅर्च्युनर गाडी उभी होती. गाडीने वेटिंग रूमचा संपूर्ण काचेचा दरवाजा तोडला होता.

गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर आरोपी डॉ. भानुदास डेरे बसलेले होते आणि त्यांच्या शेजारी पी.ए. सोमनाथ पवार होता. डॉ. डेरे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी रिसेप्शन काउंटरवर लाथा मारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ते आय.सी.यू. कडे जाऊन आज एका-एकाला संपवतो असे ओरडू लागले. यावेळी पी.ए. सोमनाथ पवार त्यांना डॉक्टर साहेब, बिनधास्त राहा, गाडी पुढे घ्या आणि एका-एकाला संपवून टाका असे म्हणून प्रोत्साहन देत होता.

डॉ. एकता वाबळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्टाफ जमा झाला. तेव्हा रिसेप्शनजवळ काम करणाऱ्या राजेंद्र अभंग (लॅब टेक्निशियन) या कर्मचाऱ्याने पुढे येऊन सांगितले की, मी काम करत असताना गाडी वेगाने माझ्या अंगावर घेऊन मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

कर्मचारी राजेंद्र अभंग यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचे समजताच डॉ. एकता वाबळे यांचा संताप अनावर झाला. वडिलांच्या राजकीय वलयाची पर्वा न करता त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉ. भानुदास गेणूजी डेरे (रा. घोडेकरमळा, ता. संगमनेर) आणि पी.ए. सोमनाथ पवार यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली आहे. एका नामांकित राजकीय नेत्याने केवळ कौटुंबिक वादातून असे विकृत आणि हिंसक कृत्य केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, डेरे यांच्या कृतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 5,070
भानुदास डेरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

By अनंत पांगारकरJuly 31, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीचा लढा आता एका…

आज, शुक्रवार ३१ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 31, 2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.