Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीत धुसफूस! थोरात यांचा खळबळजनक दावा: लवकरच अंतर्गत ‘बॉम्ब’ फुटेल, भाजपला घराणेशाहीवर बोलण्याचा हक्क नाही
राजकारण

महायुतीत धुसफूस! थोरात यांचा खळबळजनक दावा: लवकरच अंतर्गत ‘बॉम्ब’ फुटेल, भाजपला घराणेशाहीवर बोलण्याचा हक्क नाही

निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संवैधानिक संस्थेने स्वायत्त आणि निर्भीड राहिले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने आयोग स्वतःचे निर्णय घेत नाही, तर बाहेरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचीच अंमलबजावणी होते असे दिसते. त्यामुळेच लोकांचा आयोगावरचा विश्वास ढासळला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वर्तवली आहे. राज्यातील महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत घुसमट आता तीव्र होत चालली असून, या मतभेदांचा मोठा स्फोट लवकरच पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला. ते संगमनेर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

माजीमंत्री थोरात म्हणाले की, महायुतीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप आणि नाराजीचे वातावरण आहे. हे मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. ही केवळ सुरुवात आहे; पुढे याचा मोठा राजकीय स्फोट दिसेल. थोरात यांच्या या विधानामुळे महायुतीतील अस्थिरतेच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

भाजपकडून काँग्रेस व महाविकास आघाडीवर होणाऱ्या घराणेशाहीच्या टीकेला थोरात यांनी जशास तसे उत्तर दिले. घराणेशाहीचा आरोप करण्याचा भाजपला काहीही नैतिक अधिकार नाही. त्यांच्याच पक्षात अनेक लोकप्रतिनिधी एकाच कुटुंबातून येतात आणि उच्च पदांवर विराजमान आहेत, असे थोरात म्हणाले.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संवैधानिक संस्थेने स्वायत्त आणि निर्भीड राहिले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने आयोग स्वतःचे निर्णय घेत नाही, तर बाहेरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचीच अंमलबजावणी होते असे दिसते. त्यामुळेच लोकांचा आयोगावरचा विश्वास ढासळला आहे, अशी स्पष्ट टीका त्यांनी केली.

याउलट, महाविकास आघाडीची घडी अधिक मजबूत होत असल्याचा दावा थोरात यांनी केला. राजकारणात समविचारी लोक आणि पक्ष एकत्र येत आहेत. महाविकास आघाडी लोकशाही, सामाजिक न्याय आणि संवैधानिक मूल्यांची बाजू घेणारी आहे. या भूमिकेमुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये अधिक मजबूत होऊ. महाविकास आघाडी सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

भाजप व महायुतीविरोधात लढण्यासाठी व्यापक रणनीती आखल्याचे सांगत थोरात म्हणाले, भाजप आणि महायुतीची विचारसरणी आमच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांचा पराभव कसा करायचा, त्यांचे नामोहरण कसे करायचे आणि विजय कसा मिळवायचा याचा विचार आम्ही करत आहोत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,239
बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.