Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारचा ऐतिहासिक निर्णय: नागरी भागातील ‘तुकडेबंदी’ रद्द, ३ कोटी नागरिकांना दिलासा; आ. अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याने तुकडेबंदीचे व्यवहार आता विनाशुल्क नियमित होणार
राजकारण

सरकारचा ऐतिहासिक निर्णय: नागरी भागातील ‘तुकडेबंदी’ रद्द, ३ कोटी नागरिकांना दिलासा; आ. अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याने तुकडेबंदीचे व्यवहार आता विनाशुल्क नियमित होणार

तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची दिशा निश्चित केली होती. आ. खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत तुकडेबंदी रद्द करण्याची घोषणा केली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शासनाने नागरी क्षेत्रांतील कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, नागरी भागांमध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमिनीचे व्यवहार आता विनाशुल्क नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ३ कोटी लोकांना थेट कायदेशीर आणि आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
या संदर्भात आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकले होते, ज्यामुळे लाखो सर्वसामान्य नागरिक आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत सापडले होते. हेच लक्षात घेऊन, आमदार खताळ यांनी विधानसभेत या समस्येकडे लक्ष वेधले आणि हे व्यवहार शुल्क न आकारता त्वरित नियमित करण्याची प्रखर मागणी केली.
तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची दिशा निश्चित केली होती. आ. खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत तुकडेबंदी रद्द करण्याची घोषणा केली आणि त्यानुसार महसूल विभागाने यासंदर्भातील प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. खताळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांचे आभार मानले. हा निर्णय सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावरून मोठा आर्थिक आणि कायदेशीर भार उतरवणारा आहे. महायुती सरकार खऱ्या अर्थाने जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहे, असे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,238
अमोल खताळ तुकडे बंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

By Annant Ppangarkar27/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे संत…

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.