Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाच प्रकरणी तीन बडे अधिकारी ACB च्या गळाला! दोघे पकडले एक पसार, अहिल्या नगर जिल्ह्यातील घटना
गुन्हेगारी

लाच प्रकरणी तीन बडे अधिकारी ACB च्या गळाला! दोघे पकडले एक पसार, अहिल्या नगर जिल्ह्यातील घटना

बुधवारी सायंकाळी पारनेर पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर: मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी पारनेर पंचायत समितीचे उपअभियंता आणि दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. यापैकी पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी आणि तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे हे पसार झाले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या फर्मला पारनेर येथील ‘मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजने’ अंतर्गत कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे काम मिळाले होते. या कामाचे मोजमाप करणे, देयके तयार करणे आणि मंजुरीसाठी पाठवणे ही जबाबदारी उपअभियंता अजय जगदाळे, पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी आणि तांत्रिक सहायक दिनकर मगर यांच्याकडे होती.

या कामाच्या देयक मंजुरीसाठी तिघांनी तक्रारदाराकडे ६५ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला.

ACB च्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, बुधवारी सायंकाळी पारनेर पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचला. या सापळ्यात पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी (स्वतःसाठी व उपअभियंत्यांसाठी) यांनी तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर यांच्यामार्फत तक्रारदाराकडून ६५ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ACB चे पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले की, अटक केलेले विलास चौधरी आणि दिनकर मगर या दोघांना आज, शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. तसेच, पसार झालेले उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे (मूळ नियुक्ती श्रीगोंदा पंचायत समिती, पारनेरचा अतिरिक्त कार्यभार) यांच्या श्रीगोंदा येथील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली आहे.

ही कारवाई उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाळासाहेब कराड, हरूण शेख यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक राजू आल्हाट अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,917
लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.