Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नारीशक्ती विधेयकाला विरोधाचा संगमनेरमध्ये शिवसेनेकडून तीव्र निषेध; राहुल गांधींविरोधात महिलांची ‘बांगड्या’ दाखवून घोषणाबाजी
राजकारण

नारीशक्ती विधेयकाला विरोधाचा संगमनेरमध्ये शिवसेनेकडून तीव्र निषेध; राहुल गांधींविरोधात महिलांची ‘बांगड्या’ दाखवून घोषणाबाजी

जोपर्यंत महिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील. - साक्षी सूर्यवंशी, नगरसेविका.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

लोकसभेत मांडण्यात आलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या धोरणांविरोधात संगमनेर शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला.

बसस्थानक परिसरात एकत्र येत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिलांनी हातात बांगड्या घेऊन आणि निषेधाचे फलक झळकावून परिसर दणाणून सोडला होता.

नारीशक्ती वंदन अधिनियम हा केवळ कायदा नसून ती ‘मोदींची गॅरंटी’ आहे, ज्याद्वारे महिलांना सन्मान आणि समान संधीची खात्री मिळणार आहे. या विधेयकामुळे ग्रामीण भागातून नवीन आणि कर्तृत्ववान महिला नेतृत्व पुढे येण्यास मदत होणार असताना, काँग्रेसने मात्र महिला शक्तीला नाकारून केवळ घराणेशाहीला महत्त्व दिले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व करत विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला. या आंदोलनात महिला सहभागी झाल्या होत्या. नारीशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसेच महिलांच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या शक्तींना धडा शिकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नारीशक्ती वंदन विधेयक हे खऱ्या अर्थाने महिलांच्या राजकीय आणि सामाजिक सक्षमीकरणाचा पाया आहे. मात्र, केवळ राजकीय द्वेषापोटी राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करून महिलांच्या प्रगतीला खिळ घालण्याचे काम केले आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याऐवजी त्यांना दुय्यम स्थान देण्याची काँग्रेसची ही वृत्ती आम्ही कदापि सहन करणार नाही. जोपर्यंत महिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील. – साक्षी सूर्यवंशी, नगरसेविका.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 796
आंदोलन नारीशक्ती वंदन अधिनियम महिला विधेयक साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.