Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बनले ड्रग्ज तस्करीचे ‘हब’? फॉर्च्युनर गाडीसह 43 लाखाच्या मुद्देमालासह मेफेड्रोन जप्त, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेर बनले ड्रग्ज तस्करीचे ‘हब’? फॉर्च्युनर गाडीसह 43 लाखाच्या मुद्देमालासह मेफेड्रोन जप्त, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुढील तपास व रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस काय पाऊले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/11/2025Updated:22/11/2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – संगमनेर शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात आतापर्यंतची आणखी एक मोठी आणि निर्णायक मोहीम यशस्वी केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल 3,09,000 रुपये किमतीचे ‘मेफेड्रोन’ (Mephredone – M.D.) हे उच्चभ्रू ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत नाशिक येथील एका तरुणाला अटक करण्यात आली असून, तस्करीसाठी वापरलेली 40 लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर (क्र. MH 15 FF 9630) ही आलिशान गाडीही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ड्रग्ज आणि वाहनाची एकूण किंमत सुमारे 43 लाख रुपये इतकी आहे.
संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात असलेले पोलिस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांच्या फिर्यादीनुसार, ही कारवाई शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. रात्रपाळी गस्त सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना ‘गणेश नगर परिसरात, होंडा शोरूमसमोरील परिवार किराणा स्टोअर्सच्या मागे एक तरुण पहाटेच्या वेळी पांढऱ्या पावडरची (एमडी) विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच सोनवणे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक बारवकर यांना खास गुप्त बातमीदाराकडून आरोपीचे नाव व वर्णन मिळाले. आशिष महिरे (वय अंदाजे 28 ते 30 वर्षे, रा. नाशिक) हा सडपातळ बांधा, सावळा वर्ण असलेला तरुण मध्यरात्री ०३.३० वाजेच्या सुमारास संगमनेर येथे ‘एमडी’ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती निश्चित झाली. ०४.०५ वाजता नाशिकच्या दिशेकडून ‘सिल्वर’ रंगाची फॉर्च्युनर (क्र. MH 15 FF 9630) गाडी येऊन थांबली. त्यातून उतरलेला संशयित इसम हा आशिष महिरे याच्या वर्णनाशी जुळणारा होता. त्याने काळ्या रंगाची नाईट पॅट, टी-शर्ट आणि जर्किन परिधान केले होते. तो गिऱ्हाईकांची वाट पाहत उभा होता आणि त्याची संशयित नजर पोलिसांच्या लक्षात आली. संशयित निघून जाण्याच्या बेतात असतानाच ०४.१० वाजता पोलीस पथकांनी त्याला घेराव घालून जागेवरच ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने त्याचे नाव आशिष सुनिलदत्त मेहेरे (वय 28 वर्षे, व्यवसाय सलून, रा. प्लॉट क्र-१४, पुष्पकुटी, शिवाजी नगर, सातपूर, नाशिक) असे सांगितले. पोलीस शिपाई मुकरे यांनी पंचांसमक्ष मेहेरे याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशातून प्लास्टिकची एक पिशवी मिळाली. त्यानंतर त्याची फॉर्च्युनर गाडी तपासली असता, त्यात आणखी पॅकबंद पिशव्या आढळल्या. ही पावडर उघडून पाहिली असता, आतमध्ये उग्र वास असलेली पांढऱ्या रंगाची स्फटिक सदृश पावडर (White Crystalline Powder) आढळून आली. ही पावडर ‘एम.डी.’ (M.D.) हा अंमली पदार्थ असल्याचे आरोपीने कबूल केले. इलेक्ट्रॉनिक काट्याच्या सहाय्याने पिशवीसह या अंमली पदार्थाचे एकूण वजन 103 ग्रॅम भरले. 1 ग्रॅमसाठी 3000 रुपये या प्रमाणे या 103 ग्रॅम एमडीची एकूण किंमत 3,09,000/- रुपये इतकी आहे.
शहर अंमली पदार्थांच्या तस्करीचे हब? – आरोपी आशिष मेहेरे याच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम 8 (क) आणि 22 (क) नुसार संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दमदार कामगिरी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखालीपोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखालील दोन विशेष पथकांची रचना केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, तसेच पोलीस हवालदार दत्तात्रय मेंगाळ, पोलीस हवालदार अनिल कडलग, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक बापूसाहेब हांडे आणि पोलीस शिपाई सुनिल ढाकणे (उपविभागीय पोलीस कार्यालय) यांच्यासह पोलीस शिपाई विजय खुळे, पोलीस शिपाई राम मुकरे, पोलीस शिपाई सुरेश मोरे, पोलीस शिपाई रोहिदास क्षीरसागर, पोलीस शिपाई आत्माराम पवार आणि पोलीस शिपाई अजित कुऱ्हे, विशाल कर्पे (संगमनेर शहर पोलीस स्टेशन) यांचा समावेश होता.

खरंतर, संगमनेर शहरात गेली महिन्याभरतील गुन्ह्यांचा मेफेंटरमाइन इंजेक्शन, गांजा, हुक्का, मारहाण करून लुटमार तसेच तरुणाने कोयत्याने हात धडापासून वेगळा करण्याचा घटनाक्रम बघता येथील तरुणाई आता व्यसनाच्या आणि गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. संगमनेर शहर हे अमली पदार्थ तस्करीचे हब बनत असून 1 ग्रॅम ड्रग्जची किंमत 3,000 रुपये असताना हे ड्रग्ज घेणारी मुलं ही उच्चभ्रू घराण्यातील असुन ती हाय प्रोफाइल व्यसन करून पार्ट्या करत असल्याचे आता आढळून येत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील महिला मार्केटमध्ये जाताना विचार करत असून सात वाजले की बाहेर पडण्याची हिंमत होत नाही. या रॅकेटमध्ये राजकीय लोकांचे धागेदोरे आहेत का, यातून जमावासाठी तरुण मुलांचा वापर केला जात आहे का, या दिशेनेही तपास करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. पुढील तपास व रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस काय पाऊले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,704
गुन्हेगारी मेफेड्रोन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.