Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपरिषद निवडणूक: महायुतीत फूट, भाजपच्या माजी नगरसेविका मेधा भगत यांची नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी; 43 उमेदवारांची माघार; जाणून घ्या… कोण आहेत निवडणुकीचे मैदान सोडून बाहेर पडणारे, नगराध्यक्षपदासाठी आता यांच्यात लढत!
निवडणूक

संगमनेर नगरपरिषद निवडणूक: महायुतीत फूट, भाजपच्या माजी नगरसेविका मेधा भगत यांची नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी; 43 उमेदवारांची माघार; जाणून घ्या… कोण आहेत निवडणुकीचे मैदान सोडून बाहेर पडणारे, नगराध्यक्षपदासाठी आता यांच्यात लढत!

निवडणुकीच्या मैदानात नगराध्यक्षपदासाठी 8 महिला उमेदवार कायम आहेत. या लढतीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार असल्याने चुरस वाढणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2025Updated:22/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: राज्यभरात एकीचा नारा देणारी महायुती संगमनेरमध्ये फुटली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका मेधा भगत यांनी नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवले आहे यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर माजी नगरसेविका सुषमा तवरेज यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत वाढविली आहे. संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवक सदस्यपदासाठी 36 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल केलेल्या एकूण 43 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या सर्वांचे नगराध्यक्ष अथवा नगरसेवक होण्याचे स्वप्न मावळले आहे.
नगराध्यक्षपदासाठी माघार घेणाऱ्यांमध्ये दोन प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीच्या सुजाता राजेंद्र देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली कपिलेश्वर पवार यांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवार असलेल्या केसेकर सुनीता कैलास, गलांडे रेखा संपत, बेपारी शबाना रईस, डॉ. रूपाली संग्राम जोंधळे आणि शेख अफसाना इलियास यांनीही माघार घेतली आहे. 7 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात नगराध्यक्षपदासाठी 8 महिला उमेदवार कायम आहेत. या लढतीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार असल्याने चुरस वाढणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉककडून तांबे मैथिली सत्यजित आणि शिवसेनेकडून श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ श्रीमती सुवर्णा संदीप खताळ यांचा समावेश आहे. याशिवाय अपक्ष म्हणून तवरेज सुषमा संजय, सय्यद आलिया शौकतआली, शेख तबस्सुम मोहम्मद शरीफ, भगत मेधा दीपक, आलिशा असलम शेख आणि शेख बानोबी लियाकत या महिला उमेदवार रिंगणात आहेत.
शुक्रवारी दुपारनंतर माघार, नाराजी नाट्य आणि बंडखोरीची चर्चा सुरू झाली होती. काहींनी श्रेष्ठींचा आदेश मानत माघार घेतली. काहींनी आपली नाराजी कायम ठेवत स्वीकृत साठी दावा केला तर काहींनी मात्र बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता विविध चर्चांना उधाण आले आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांविषयी थेट ‘पेटी आणि खोक्याची भाषा’ वापरली जात आहे, तर काही निष्ठावान उमेदवारांच्या माघारीवर नागरिकांनी खंतही व्यक्त केली आहे.
कोणाचे मत कोणाच्या पारड्यात? – नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवार असल्याने, हे उमेदवार कोणाची मते विभागतात किंवा कोणाला थेट फायदा होतो, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. संगमनेरकर ही निवडणूक चुरशीची करतात की एकतर्फी, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
सदस्यपदासाठी अर्ज मागे घेणाऱ्या 36 उमेदवारांची प्रभागनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे:
प्रभाग 1 अ: ढोले अश्विनी सतीश आणि फड वैष्णवी संजय.
प्रभाग 2 ब: दिड्डी रूपाली अभिजीत.
प्रभाग 3 ब: सुनंदा मच्छिंद्र दिघे.
प्रभाग 4 अ: कडलग विद्या प्रकाश आणि गायकवाड चंद्रकला शंकर.
प्रभाग 4 ब: आहेर सतीश भाऊसाहेब.
प्रभाग 5 ब: पवार किशोर सावळेराम.
प्रभाग 6 ब: कानकाटे सोमनाथ सदाशिव, भुजबळ संतोष रमेश आणि राहुल देवराम म्हस्के.
प्रभाग 7 ब: कोठवळ आशिष तुकाराम, भरीतकर माधव त्रिंबक, मंडलिक किशोरी सुभाष आणि शिंदे नारायण सावळेराम.
प्रभाग 8 अ: अरगडे प्रीती अनुज.
प्रभाग 8 ब: कुक्कर भगवान रामदास.
प्रभाग 9 अ: सय्यद अमजद दाऊद.
प्रभाग 9 ब: शेख मुस्कान मुजफ्फर.
प्रभाग 10 अ: शेख दिलशाद अजीज.
प्रभाग 10 ब: इनामदार एजाज जमील.
प्रभाग 11 अ: जहागीरआली जावेदआली सय्यद, शेख रईस मुख्तार, शोयब मुजीब शेख आणि सय्यद अन्सार मकबूल.
प्रभाग 12 अ: बेपारी शफी हाजीपापाभाई आणि बेपारी तबरेज मो. रफीक.
प्रभाग 12 ब: अमृतवाड दीपा व्यंकटेश.
प्रभाग 13 अ: घोगले रूपाली विजय आणि जेधे सुनीता कुंदन.
प्रभाग 13 ब: उपरे मुकुंद मुरलीधर, डुकरे अमोल राजेंद्र आणि वाडेकर प्रशांत पद्माकर.
प्रभाग 14 ब: पवार अकील नजीरखान.
प्रभाग 15 अ: मोमीन जैद जुनेद.
प्रभाग 15 ब: शेख जुलेखा फैरोज.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,049
उमेदवारी अर्ज माघार संगमनेर नगरपालिका निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.