Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरातांची चिंता: मागील एका वर्षात संगमनेरची शांतता आणि सुव्यवस्था बिघडली, ड्रग्ज तस्करी वाढल्याचा आणि दडपशाहीचा माजी मंत्र्यांकडून आरोप; सेवा समितीच्या उमेदवारांसाठी केले आवाहन
गुन्हेगारी

बाळासाहेब थोरातांची चिंता: मागील एका वर्षात संगमनेरची शांतता आणि सुव्यवस्था बिघडली, ड्रग्ज तस्करी वाढल्याचा आणि दडपशाहीचा माजी मंत्र्यांकडून आरोप; सेवा समितीच्या उमेदवारांसाठी केले आवाहन

त्यांनी नुकत्याच पकडल्या गेलेल्या ४३ लाखांच्या अमली पदार्थांचा आणि दोन दिवसांपूर्वी एका मुलाचा हात तोडल्याच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी मागणी केली, हात तुटलेला मुलगा आणि तोडणारा मुलगा कोण आहे, तपासा. पोलीस स्टेशनमध्येही मारामाऱ्या होत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आणि अशांतता व अशी संस्कृती आपल्याकडे कधीही नव्हती, असे ते म्हणाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

मागील एका वर्षापासून शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडली असून, दडपशाहीसह अमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याची गंभीर चिंता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

शनिवारी (२२ नोव्हेंबर) मालदाड रोड येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी के. के. थोरात, शांताराम कढणे, विवेक कासार, सादिक तांबोळी, सौरभ कासार, शोभाताई पवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर शहर आणि तालुक्याने शिक्षण, सहकार आणि अर्थव्यवस्था या क्षेत्रांत केलेल्या विकासामुळे राज्याच्या अग्रगण्य शहरांमध्ये आपले स्थान निर्माण केले. विकासाच्या दीर्घ परंपरेचा उल्लेख करत माजी मंत्री थोरात यांनी डॉ. सुधीर तांबे यांच्यापासून दुर्गाताई तांबे यांच्यापर्यंत शहरात राबवलेल्या विकासकामांची आठवण करून दिली. शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभावाचे वातावरण हे शहराचे वैशिष्ट्य राहिले आहे. शहरासाठी ऐतिहासिक निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना सुरू असून यामुळे स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. सहकार चळवळीमुळे शहरातील बाजारपेठ फुलली आहे, तर शिक्षण संस्थांमुळे बाहेरील विद्यार्थी संगमनेरमध्ये येत असून अर्थकारणाला गती मिळाली आहे. ‘समृद्ध संगमनेर शहर’ हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच, अद्ययावत बस स्थानक, संगमनेर बायपास, तसेच नाशिक-पुणे रोड चौपदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण यांसारखे महत्त्वाचे विकास प्रकल्प पूर्ण करण्यात आले.

थोरात यांनी मागील एका वर्षातील बदलांवर बोट ठेवले. त्यांनी शहरात वाढलेल्या अशांततेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मागील एका वर्षापासून मात्र संगमनेरमध्ये अशांतता वाढली आहे. बस स्थानक फ्लेक्स बाजीने झाकलेले होते. शिवाजीनगरकडे जाणारे रस्त्यावर असलेल्या आपल्या कमानीवर इतरांनी डबल कमान टाकली, त्यातून त्यांची वृत्ती कळते.

ड्रग्ज आणि गुन्हेगारीवर गंभीर चिंता – अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी नुकत्याच पकडल्या गेलेल्या ४३ लाखांच्या अमली पदार्थांचा आणि दोन दिवसांपूर्वी एका मुलाचा हात तोडल्याच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी मागणी केली, हात तुटलेला मुलगा आणि तोडणारा मुलगा कोण आहे, तपासा. पोलीस स्टेशनमध्येही मारामाऱ्या होत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आणि अशांतता व अशी संस्कृती आपल्याकडे कधीही नव्हती, असे ते म्हणाले.

संगमनेर शहराला पुन्हा ‘गत वैभव’ प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सेवा समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मालदाड रोड परिसरातील कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिकांनी जोरदार स्वागत केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,074
गुन्हेगारी बाळासाहेब थोरात संगमनेर नगरपालिका निवडणूक सेवा समिती उमेदवार प्रचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.