Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युवा नेतृत्वाचा ‘टेक-ऑफ’! आमदार सत्यजित तांबे यांचा ‘संगमनेर 2.0’ विकासाच्या नव्या अजेंड्यासह सज्ज! ‘प्रतिक्षा संपली! संगमनेर 2.0 जाहीर सभा!’ या समाज माध्यमातील व्हायरल पोस्टची रंगली चर्चा
निवडणूक

युवा नेतृत्वाचा ‘टेक-ऑफ’! आमदार सत्यजित तांबे यांचा ‘संगमनेर 2.0’ विकासाच्या नव्या अजेंड्यासह सज्ज! ‘प्रतिक्षा संपली! संगमनेर 2.0 जाहीर सभा!’ या समाज माध्यमातील व्हायरल पोस्टची रंगली चर्चा

या सभेच्या माध्यमातून तांबे नगराध्यक्षपदाच्या लढतीला निर्णायक कलाटणी देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/11/2025Updated:28/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर 

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रतिक्षा संपली! संगमनेर 2.0 जाहीर सभा!’ या समाज माध्यमातील व्हायरल पोस्टमुळे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. तांबे यांची ही नवी पोस्ट काय आहे? याची संगमनेरकरांमध्ये आता उत्सुकता वाढली आहे. आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबे स्थानिक विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असल्याने अपेक्षा वाढल्या आहे.

‘संगमनेर 2.0’ च्या माध्यमातून आमदार तांबे हे शहराच्या विकासाचा एक नवा अजेंडा नागरिकांसमोर मांडणार असल्याची चर्चा आहे. या सभेच्या घोषणेमुळे नगराध्यक्षपदाच्या या लढाईला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तांबे समर्थकांमध्ये ही निवडणूक केवळ उमेदवारांमधील नसून, संगमनेरला ‘मुक्त’ करण्याची लढाई असल्याची भावना जोर धरू लागली आहे.

सत्यजीत तांबे यांच्या या संकल्पनेतून शहरवासीयांना अनेक गोष्टींचे स्वातंत्र्य (मुक्ती) देण्याचे आश्वासन दिले जात आहे. यात प्रामुख्याने भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कठोर उपाययोजना असतील. तसेच, विकासकामांना असलेली लाल फितीच्या कारभारातून मुक्ती देऊन, नागरिकांच्या गरजेनुसार आणि वेळेत कामे पूर्ण करण्याची गती आणली जाईल. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तांबे हे निर्णय प्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढवून, केवळ नेतेमंडळी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला शहर विकासाच्या निर्णय प्रक्रियेत हक्काचे स्वातंत्र्य देण्याचा मनोदय बाळगून आहेत. याशिवाय, पायाभूत सुविधांची हमी देत, पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना वारंवार झगडावे लागत असलेल्या त्रासातून मोकळीक मिळवून देण्याचे आश्वासनही या माध्यमातून दिले जात आहे.

या निवडणुकीतून तांबे गट युवा नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू करू इच्छितो. हे नेतृत्व संगमनेरच्या राजकारणाला पारंपारिक वर्चस्वातून बाहेर काढत, अधिक गतिमान आणि आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न करेल.

तांबे यांच्या पोस्टमध्ये ‘पुढील माहिती लवकरच…’ असे नमूद केल्याने, ही जाहीर सभा कधी, कोणाची आणि कुठे होणार, याकडे आता केवळ संगमनेरवासीयांचेच नव्हे, तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सभेच्या माध्यमातून तांबे नगराध्यक्षपदाच्या लढतीला निर्णायक कलाटणी देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 866
संगमनेर नगरपरिषद निवडणूक सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.