Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा महायुतीवर ‘टोल वसुली’ आणि ‘बनवाबनवी’चा हल्लाबोल! आधी नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा, मग संगमनेरला या!
निवडणूक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा महायुतीवर ‘टोल वसुली’ आणि ‘बनवाबनवी’चा हल्लाबोल! आधी नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा, मग संगमनेरला या!

संगमनेरमध्ये खूप विकास झाला आहे, मात्र विरोधकांच्या डोळ्यांना तो दिसत नाही. चिलट प्राणी गडबड करायला लागले की तेव्हा सिंह बाहेर येतो. समोरचे लोक ढोंगी आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या कारभारावर ‘टोल वसुली’ आणि ‘खोट्या आश्वासनांची बनवाबनवी’ ही दोन प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचा गंभीर आरोप करत संगमनेर येथील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर संगमनेर सेवा समितीच्या विराट जाहीर सभेत बोलताना जोरदार टीकास्त्र सोडले.
शुक्रवारी सायंकाळी संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे, हिरालाल पगडाल, पप्पू कानकाटे, इसहाकखान पठाण, अजय फटांगरे, प्रमिला अभंग यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी थोरात यांनी महायुतीच्या नेत्यांना थेट आव्हान देत म्हटले, पहिला नगर-मनमाड गचक्यांचा रस्ता पूर्ण करा आणि मग संगमनेरमध्ये या. मागील एक वर्षापासून प्रत्येक कामात ‘टोल वसुली’ सुरू असल्याचा आणि आपण मंजूर केलेली रेल्वे बाहेरून जात असतानाही लोकप्रतिनिधी गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला.
मागील तीस वर्षात संगमनेर नगरपालिकेला शिस्त लावली. आदर्श नगरपालिका म्हणून काम झाले. शहरासाठी स्वच्छ पाणी पुरवले. सातत्याने विकासाचा योजना राबवल्या. शहर विकसित केले असल्याचे सांगत गुरुवारी उपमुख्यमंत्र्यांनी संगमनेरमध्ये येऊन मंत्र्यांना फोन लावून विकासाची आश्वासने दिली. मात्र, थोरात यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांचे प्रात्यक्षिक सर्वांना ऐकवले. महायुतीचे मंत्री ‘डोंगर मंजूर, नद्या मंजूर, जे मागाल ते मंजूर’ अशी केवळ ‘बनवाबनवी आणि निवडणुकीसाठी फंडे’ वापरत आहेत, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
स्वच्छ पाणीपुरवठा, नीळवंडे धरण व कालवे पूर्ण करणे, ३८ किलोमीटरची पाईपलाईन, नवीन जलशुद्धीकरण आणि वितरण जाळे, बायपास व बसस्थानक, तसेच ३५ गार्डन्स उभारणे यांसारखी सातत्याने विकासाची कामे केली. मात्र, मागील एका वर्षापासून संगमनेरमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शहरात ड्रग्ज व अमली पदार्थ मिळत असून, पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या आणि गुंडगिरी वाढली आहे. यामागे कोणाचे अभय आहे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेरमध्ये खूप विकास झाला आहे, मात्र विरोधकांच्या डोळ्यांना तो दिसत नाही. चिलट प्राणी गडबड करायला लागले की तेव्हा सिंह बाहेर येतो. समोरचे लोक ढोंगी आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 642
जाहीर सभा निवडणूक प्रचार बाळासाहेब थोरात संगमनेर सेवा समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.