Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजित तांबे यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार: ‘टायगर’ स्वार्थी तर ‘सिंह’ सर्वांना घेऊन येतो! उपमुख्यमंत्र्यांच्या ‘विकास’ दाव्यांचा केला पर्दाफाश
निवडणूक

आमदार सत्यजित तांबे यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार: ‘टायगर’ स्वार्थी तर ‘सिंह’ सर्वांना घेऊन येतो! उपमुख्यमंत्र्यांच्या ‘विकास’ दाव्यांचा केला पर्दाफाश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा न करता 'शेजारच्यांना समजून सांगावे'
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर 
गुरुवारच्या सभेत कोणीतरी ‘टायगर’ आला होता. टायगर हा स्वार्थी असल्याने एकटा येतो, तर जंगलचा राजा ‘सिंह’ (बाळासाहेब थोरात) सर्वांना बरोबर घेऊन येतो. राजकीय कार्यकर्त्याचे भाषण हे मुद्द्याचे असावे, करमणुकीचे नसावे, असा टोला नाव न घेता आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांना लगावला.
उपमुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे खंडन करत, सत्ताधाऱ्यांचे राजकारण केवळ ‘करमणुकीचे’ असल्याचे सांगत संगमनेर सेवा समितीच्या विराट सभेत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भाषणातून महायुतीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना फोन करून मंजूर केलेल्या कामाचा दाखला दिला, परंतु ते काम माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २८ जानेवारी २०२० रोजीच मंजूर करून ठेवले होते. तसेच, एमआयडीसीसाठी एप्रिल २०२५ मध्ये पत्र दिले, पण त्याचे उत्तर २६ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळाले, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे तारखांसहित खंडन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा न करता ‘शेजारच्यांना समजून सांगावे’, असा उपरोधिक टोलादेखील आमदार तांबे यांनी लगावला.
तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चांगले काम झाले, पण गेल्या वर्षभरात वातावरण बिघडले आहे. ‘संगमनेर 2.0’ हा जाहीरनामा राबवण्याचा आपला शब्द असून, निवडणुकीनंतर संगमनेरमध्ये एकही अनाधिकृत फ्लेक्स लागणार नाही आणि कोणताही कार्यक्रम रस्त्यावर होणार नाही. महाराजांचा अश्वारूढ पुतळा व आरक्षणाचा मुद्दा पुढील एका वर्षात मार्गी लावणार असल्याचे सांगत संगमनेरला 50 ते 150 टीडीएसचे शुद्ध पाणी मिळत आहे. पुढील काळामध्ये एकाच वेळेस पूर्ण दाबाने पाणी मिळेल. यासाठी काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेरमधील नागरिकांनी एकत्र येऊन संगमनेर सेवा समिती स्थापन केली असून पुढील पाच वर्षात करावयाच्या कामांचा जाहीरनामा आमदार सत्यजित तांबे यांनी प्रसिद्ध केला. याचबरोबर हा जाहीरनामा राबवण्याचा आपला शब्द असून या कामासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही. कारण माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या पाठीशी आहेत त्यांचा शब्द हा प्रत्येक मंत्र्यासाठी अत्यंत आदराचा असल्याचे आमदार सत्यजित तांबे आणि सांगताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
या सभेसाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे, हिरालाल पगडाल, पप्पू कानकाटे, इसहाकखान पठाण, अजय फटांगरे, प्रमिला अभंग यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, इसाकखान पठाण आणि हिरालाल पगडाल यांचीही यावेळी भाषणे झाली.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 537
जाहीर सभा प्रचार सभा बाळासाहेब थोरात संगमनेर नगरपरिषद निवडणूक सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.