Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विकास दुवा तोडला! नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलावरून संगमनेरकरांचा केंद्र सरकारला थेट इशारा; जनआंदोलनाची युद्धपातळीवर तयारी
आंदोलन

विकास दुवा तोडला! नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलावरून संगमनेरकरांचा केंद्र सरकारला थेट इशारा; जनआंदोलनाची युद्धपातळीवर तयारी

संगमनेरकरांच्या विकासासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची नव्हे, तर जनशक्तीच्या एकजुटीची गरज आहे, हेच या आंदोलनातून स्पष्ट होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीमार्गे वळवल्यामुळे संगमनेर तालुक्यासह सिन्नर, नारायणगाव, खेड, मंचर या भागांमध्ये आता प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासाठी जमिनी आरक्षित करून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला होता, तो मार्ग अचानक बदलल्याने जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारने हा मार्ग बदलण्याचा घाट घातल्याबद्दल रेल्वे जनआंदोलन समितीने महायुतीमधील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले असून, आता राजकारण न करता या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सर्वपक्षीय नागरिकांना केले आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही रेल्वे शिर्डीमार्गे जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांना एकत्र करून मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. याला सर्वपक्षीय नागरिकांनी तात्काळ पाठिंबा दिला असून, संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पेनिंग आणि ऑनलाईन याचिका दाखल करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. संगमनेर हे केवळ बाजारपेठेचे ठिकाण नाही, तर शैक्षणिक आणि मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. व्यापाराच्या आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिक-पुणे रेल्वे या शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याने मोठा विकास साधला आहे. तालुक्यात काकडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, उत्तरेकडून समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-हैदराबाद महामार्ग, निळवंडे धरण कालवे, हायटेक इमारती आणि नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण यांसारखे मोठे प्रकल्प झाले आहेत. या सर्व विकास साखळीमध्ये नाशिक-पुणे रेल्वेचा संगमनेर मार्ग अंतिम दुवा ठरणार आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ही रेल्वे संगमनेरमधूनच गेली पाहिजे. यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मोठ जनआंदोलन उभ करणे गरजेचे आहे. रेल्वे मार्ग बदलल्याने प्रचंड नाराजी असूनही महायुती सरकारमधील मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विद्यमान लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विधानसभेत प्रश्न मांडू असे गोल-मोल उत्तर देऊन उपयोग नाही. ही रेल्वे शिर्डीमार्गे कोणामुळे वळली, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे राजकीय पत्रकबाजी न करता या निर्णायक आंदोलनामध्ये सर्वांनी प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन रेल्वे जनआंदोलन संयोजन समितीने केले आहे.

नान्नज येथील आयटी इंजिनीयर आशिष रामकर आणि श्रुती संजय रहाणे यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना थेट आव्हान दिले आहे. हा रेल्वे मार्ग कोणामुळे बदलला हे सर्वांना माहिती आहे. अधिवेशनमध्ये प्रश्न मांडू असे न म्हणता, त्यांनी एकतर सत्ताधारी पालकमंत्री यांच्या विरोधात भूमिका घ्यावी किंवा आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.

संगमनेरकरांच्या विकासासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची नव्हे, तर जनशक्तीच्या एकजुटीची गरज आहे, हेच या आंदोलनातून स्पष्ट होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 823
आंदोलन नाशिक पुणे रेल्वे मार्ग बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.