Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश दिले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध सुगंधित तंबाखू, मावा आणि गुटखा विक्रेत्यांविरोधात जोरदार धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान ७ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सुमारे २,९९,९९० रुपये किमतीचा अवैध पानमसाला, मावा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून एकूण १४ आरोपींविरुद्ध ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांना जिल्ह्यातील अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची गुप्त माहिती काढून धडक कारवाई करण्याबाबत रवाना करण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (२८ ऑगस्ट) एमआयडीसी, जामखेड व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या माहितीच्या आधारे अचानक छापे टाकले. या कारवाईत एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून फकीरवाडा येथील प्रवीण गोरख पंडित याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून १ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर शेवगाव येथील असिफ रहमान तांबोळी हा आरोपी फरार झाला आहे.

जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नान्नज व कोल्हेवाडी भागात ५ ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये नान्नज येथील गणेश शिवाजी गोरे (जप्त मुद्देमाल ४,३०० रु.), विशाल शिवाजी वटाणे (जप्त मुद्देमाल ४,३१८ रु.), वृषभ राजेंद्र पोते (जप्त मुद्देमाल ३,३०४ रु.) आणि योगेश लक्ष्मण मोहोळकर (जप्त मुद्देमाल ४,८५२ रु.) या चौघांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्व प्रकरणांत राजेगाव येथील आप्पा कुमटकर हा फरार आरोपी म्हणून नोंदवला गेला आहे. तसेच जामखेड हद्दीतील कोल्हेवाडी येथून युवराज नारायण कोल्हे याला ताब्यात घेऊन ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, या गुन्ह्यात कडा (जि. बीड) येथील सचिन जाधव हा फरार झाला आहे.

याशिवाय बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत गव्हाणवाडी येथील विजय नामदेव वाघमोडे व ढवळवाडी येथील अनिकेत रामदास सोनवणे यांच्याकडून २३ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, शाहीद शेख, संदीप पवार, राहुल द्वारके, प्रशांत राठोड, अरुण गांगुर्डे, भीमराज खर्से, योगेश कर्डीले, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, दीपक जाधव, गणेश धोत्रे, अमोल कोतकर, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रकाश मांडगे व प्रताप देवकाते यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 404
अहिल्यानगर एलसीबी गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.