Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हृदयद्रावक! ‘बरं न होण्या’च्या भीतीने आई-वडिलांनीच दाबला बाळाचा गळा; घारगावच्या हत्याकांडाचा अहिल्यानगर एलसीबीकडून उलगडा
गुन्हेगारी

हृदयद्रावक! ‘बरं न होण्या’च्या भीतीने आई-वडिलांनीच दाबला बाळाचा गळा; घारगावच्या हत्याकांडाचा अहिल्यानगर एलसीबीकडून उलगडा

बाळ बरे होणार नाही या कारणामुळे त्यांनी त्याला मारून फेकून देण्याच्या उद्देशाने बाळाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचे अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –
घारगांव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरून फेकून दिलेल्या तीन महिने वय असलेल्या शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बालकाचे खुनी अखेर जेरबंद झाले आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवांशचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीनेच त्याचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे.
४ डिसेंबर रोजी सकाळी ०९.१६ वाजता आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये अंदाजे ०३ ते ०४ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह दिसला. या घटनेनंतर घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर ७४/२०२५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता.
सदर अनोळखी बालकाची ओळख पटवून या घटनेमागील सत्य बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचा समावेश होता. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार प्रथमदर्शनी घातपाताचा असल्याचे दिसून आले. गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपास केला असता, मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली कार भोकरदन, जि. जालना येथील असल्याची माहिती प्राप्त झाली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कविता प्रकाश जाधव (वय ३२, रा. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना) या महिलेच्या नातेवाईकांनी बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले असून त्याला ३-४ दिवसांत सोडणार असल्याची अफवा पसरवल्याची माहिती मिळवली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रकाश पंडित जाधव (वय ३७), त्याची पत्नी सौ. कविता प्रकाश जाधव (वय ३२), आणि हरिदास गणेश राठोड (वय ३२) या तिघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत वडिलांनी (प्रकाश जाधव) आणि आईने (कविता जाधव) त्यांचा ०३ महिन्यांचा मुलगा शिवांश उर्फ देवांश याला हरिदास राठोड याच्या इर्टिका कारमधून बुधवारी (०३/१२/२०२५) पुण्याच्या दिशेने नेत असताना घारगांव परिसरामध्ये नदीच्या पुलाजवळ थांबवले.
बाळ बरे होणार नाही या कारणामुळे त्यांनी त्याला मारून फेकून देण्याच्या उद्देशाने बाळाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचे अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये मयताचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने घारगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर गावात चर्चा होऊ नये म्हणून आरोपींनी बाळाचे ऑपरेशन छत्रपती संभाजीनगर येथे झाल्याचे भासविले आणि बाळाच्या आईला गावातील लोकांशी बोलणे टाळण्यासाठी वेगवेगळ्या देवदर्शनासाठी पाठवले होते.
आरोपींकडून खुनासाठी वापरलेली ५,००,०००/- रुपये किंमतीची इर्टिका गाडी (क्र. एम. एच. ०२. ई. एच. ५३५४) ताब्यात घेण्यात आलेली आहे. पुढील तपास घारगांव पोलीस ठाणे करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,580
अहिल्यानगर एलसीबी तपास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.