Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहरात पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई: ८.२१ लाखांचा गांजा जप्त, चार आरोपींना अटक; सलग दुसऱ्या दिवशीही गांजा संदर्भात मोठी कारवाई!
गुन्हेगारी

संगमनेर शहरात पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई: ८.२१ लाखांचा गांजा जप्त, चार आरोपींना अटक; सलग दुसऱ्या दिवशीही गांजा संदर्भात मोठी कारवाई!

या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 

संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे आठ लाख रुपये किमतीचा ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. सातत्याने दोन दिवसात गांजा संदर्भात कारवाई झाल्याने शहरातील अवैध व्यवसायाचे मोठे नेटवर्क समोर येत आहे. या नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. संगमनेर शहरात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक पोलिसांनी केलेली ही महत्त्वाची आणि धडक कारवाई मानली जात आहे. 

गुरुवारी नाशिकच्या नार्कोटिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरालगत असणाऱ्या सुकेवाडीमध्ये अशाच प्रकारे मध्यरात्रीपासून छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये सव्वा कोटी रुपयांचा ४५६ किलो गांजा जप्त केला होता, यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या टीकेच्या पार्श्वभूमीवर, ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री ०१.४५ वाजेपासून ते ०४.३० वाजेपर्यंत शहराच्या केशव तिर्थ, गाळा नं. २, गोल्डन सिटी परिसरात करण्यात आली. 

कारवाईदरम्यान शहर पोलिसांनी शुभम चंद्रकांत जाधव (२८, रा. इंदिरानगर), विशाल अशोक गायकवाड (२२, रा. जनतानगर), प्रथमेश अशोक पावडे (२२, रा. इंदिरानगर) आणि परवेझ दाऊद शेख (२६, रा. घुलेवाडी) या चौघा जणांना अटक केली आहे. हे आरोपी पोलिसांना प्लास्टिकच्या गोणीमध्ये सुमारे ३२ किलो ८४५ ग्रॅम वजनाचा काळपट व हिरवट रंगाचा सुका गांजा (कॅनाबीस वनस्पतीचे शेंडे) विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना पोलिसांना मिळून आले.

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल विजय आण्णा खुळे यांच्या फिर्यादीवरून तत्काळ क्रमांक १०७३/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या चारही आरोपींविरुद्ध अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) चे कलम ८(क), सह २२(ब) आणि २०(ब) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपींकडे गांजा कुठून उपलब्ध झाला तो कोणाला दिला जाणार आहे याची माहिती मिळविली जाणार आहे. या आधारे पोलिसांना पुढील रॅकेट शोधणे सोयीस्कर बनणार आहे. 

या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,561
गांजा कारवाई संगमनेर शहर पोलीस संघटित गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू…

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.