Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सैन्यात निवड झालेल्या ६१ युवकांचा सन्मान: शेतकरी आणि जवान देशासाठी अत्यंत महत्त्वाचे, सैन्यात निवड झालेल्या सर्व युवकांचा तालुक्याला अभिमान! बाळासाहेब थोरात
सामाजिक

सैन्यात निवड झालेल्या ६१ युवकांचा सन्मान: शेतकरी आणि जवान देशासाठी अत्यंत महत्त्वाचे, सैन्यात निवड झालेल्या सर्व युवकांचा तालुक्याला अभिमान! बाळासाहेब थोरात

आपल्या मुला-मुलींच्या या गौरवाने पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. संगमनेर तालुक्यासाठी हा दिवस अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

शेतकरी कष्ट करून अन्न पिकवतो आणि जवान ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करतो. या दोघांचेही देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे महत्त्व आहे. ज्या युवकांना देशसेवेची संधी मिळाली, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आपल्या कुटुंबाचे आणि तालुक्याचे नाव मोठे करावे, सैनिकांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१३ डिसेंबर) संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सैन्यात आणि पोलीस दलात निवड झालेल्या ६१ तरुण-तरुणींचा आणि त्यांच्या पालकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, निखिल पापडेजा, लता गायकर, सुंदराबाई डुबे, विलास शिंदे, मेजर संदीप गुंजाळ, अशोक लांडगे, भास्कर शरमाळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, अभिजीत बेद्रे, विक्रम खबाले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

निवड झालेल्या ६१ युवकांचा व त्यांच्या पालकांचा शाल, बुके आणि विशेषतः झाडांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. हा सन्मान केवळ नोकरी मिळवल्याबद्दल नसून, देशसेवेच्या महान कार्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाचे प्रतीक होता.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाचा सैनिक आणि शेतकरी यांच्या जीवावर देश उभा आहे. युवकांनी अत्यंत परिश्रम करून सैन्यामध्ये नोकरी मिळवली आहे. या निमित्ताने देशासोबतच जगामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबाचा आणि तालुक्याचा लौकिक वाढवा.

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी युवकांचे अभिनंदन करताना सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील युवकांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने काम केले आहे. नोकरीसाठी मोठी स्पर्धा असली तरी, खडतर परिश्रम करून या युवकांनी यश मिळवले आहे. त्यांनी तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत सैन्यामध्ये निवड होणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे आणि संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे. आपल्या परिवारातील विद्यार्थी सीमेवर जात आहेत, याचा अमृत उद्योग समूहालाही अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी निवड झालेल्या विविध युवकांनी आपले मनोगते व्यक्त करत या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केले. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मुला-मुलींच्या या गौरवाने पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. संगमनेर तालुक्यासाठी हा दिवस अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 776
बाळासाहेब थोरात सत्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या…

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.