Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्यामुक्त तालुक्यासाठी जनआक्रोश: प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराविरोधात संगमनेरमध्ये जनता आक्रमक, निवेदन स्वीकारायला न आल्याने प्रांताधिकाऱ्यांची दिसली अनास्था; आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची आक्रमक भूमिका
आंदोलन

बिबट्यामुक्त तालुक्यासाठी जनआक्रोश: प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराविरोधात संगमनेरमध्ये जनता आक्रमक, निवेदन स्वीकारायला न आल्याने प्रांताधिकाऱ्यांची दिसली अनास्था; आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची आक्रमक भूमिका

अखेरीस, आंदोलकांच्या रेट्यापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि प्रांत अधिकारी उंडे यांनी आंदोलकांना सामोरे जात निवेदन स्वीकारले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – अनंत पांगारकर
संगमनेर तालुक्याला बिबट्यामुक्त करण्यासाठी आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार, दि. १५ डिसेंबर) संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. न्याय मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असताना प्रशासनाचे मात्र अनास्था दिसून आली. जनतेला उत्तरदायित्व असलेल्या प्रांताधिकार्‍यांनी निवेदन घेण्यास आचारसंहितेचे कारण दाखवत टाळाटाळ केल्याने संतापलेल्या आंदोलकांपुढे मात्र अखेरीस त्यांना नमते घेऊन निवेदन स्वीकारण्यासाठी नागरिकांमध्ये यावे लागले.
गेल्या एका वर्षात १२ नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, बिबट्यांची वाढलेली संख्या तालुक्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. या गंभीर प्रश्नावर प्रभावी उपाययोजना व्हावी यासाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानक ते प्रांत कार्यालय असा भव्य मोर्चा निघाला. या मोर्चात बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या सिद्धेश कडलगचे वडील सुरज कडलग यांच्यासह शेकडो नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, महिला आणि युवकांनी यात सहभाग घेतला. जन आक्रोश आंदोलन समिती आणि डॉ. जयश्री थोरात यांनी यापूर्वीच बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या निर्णायक लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.
जन आक्रोश मोर्चा नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनासमोर आल्यानंतर प्रशासनाने गेटवरच मोर्चा अडविला. निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण देत टाळाटाळ केल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात चांगल्याच आक्रमक झाल्या.आमदार तांबे यांचा प्रशासनाला थेट इशारा- प्रांताधिकारी निवेदन स्वीकारायला येत नसल्याचे पाहून आमदार सत्यजित तांबे यांनी प्रशासनाला जोरदार इशारा दिला. ते म्हणाले, बिबट्यांच्या दहशतमुक्तीविरोधातील हे आंदोलन राजकीय नाही, यात कुणाचा स्वार्थ नाही. ज्यांचा मुलगा डोळ्यासमोर बिबट्याने उचलून नेला, ते सुरज कडलग आणि संपूर्ण समाज न्याय मिळवण्यासाठी एकत्र आला आहे. हे आंदोलन केवळ फोटो किंवा शोबाजीसाठी नाही, तर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आहे.
आमदार तांबे यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना सांगितले की, जोपर्यंत शासनाचे प्रमुख अधिकारी येत नाही तोपर्यंत जागा कोणी सोडणार नाही. माझा जन्मच आंदोलनातून झाला आहे. आम्हाला जास्त आक्रमक व्हायला लावू नका, अन्यथा कार्यकर्ते तुमच्या कार्यालयात घुसतील! प्रशासन, अधिकारी जर कुणाच्या दबावाखाली काम करत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा आक्रमक इशारा दिला. या इशाऱ्यानंतर तातडीने प्रांत अधिकारी अरुण उंडे हे आंदोलकांमध्ये आले.
आईच्या भूमिकेतून डॉ. थोरातांनी केली प्रशासनाची कानउघाडणी- डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी राजकीय कार्यकर्ती म्हणून नव्हे, तर एक आई म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ज्यांचे मुले मृत झाले त्यांची काय अवस्था आहे, हे प्रशासनाने समजून घ्यावे. थोडी तरी संवेदनशीलता दाखवा. त्यांनी प्रशासनाला जनतेमध्ये येऊन महिला आणि नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचे आवाहन केले. आचारसंहितेच्या नावाखाली लपून न बसता प्रांत अधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी त्यांनी केली.
घोषणाबाजीने दणाणले प्रशासकीय भवन- आमदार तांबे आणि डॉ. थोरात यांचे आक्रमक रूप पाहून उपस्थित हजारो नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. अखेरीस, आंदोलकांच्या रेट्यापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि प्रांत अधिकारी उंडे यांनी आंदोलकांना सामोरे जात निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, वनविभागाचे केदार आदी अधिकारी उपस्थित होते.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 714
अरुण उंडे जन आक्रोश मोर्चा जयश्री थोरात बिबट्या हल्ला सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.