Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वनमंत्र्यांचा तातडीने निर्णय; आमदार तांबे यांच्या मागणीनुसार बिबट्याच्या हल्ल्यातील सिद्धेशच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत मंजूर
सामाजिक

वनमंत्र्यांचा तातडीने निर्णय; आमदार तांबे यांच्या मागणीनुसार बिबट्याच्या हल्ल्यातील सिद्धेशच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत मंजूर

याचबरोबर, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2025Updated:16/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या ४ वर्षीय सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना आमदार सत्यजित तांबे यांच्या तातडीच्या आणि आक्रमक पाठपुराव्यातून महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाच्यावतीने १० लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात आली आहे. सकाळी जन आक्रोश आंदोलनात दिलेला शब्द आमदार तांबे यांनी कृतीसह अवघ्या ६ तासांत पूर्ण केला.

१३ डिसेंबर २०२५ रोजी जवळेकडलग येथील सिद्धेश कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, यात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी प्रशासनाने असंवेदनशीलपणा दाखवल्याने आमदार तांबे आणि डॉ. थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

यावेळी, फक्त सहानुभूती न दाखवता कडलग कुटुंबीयांना सरकारने तातडीची मदत करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली. त्यांनी तत्काळ वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून सिद्धेश कडलग यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली. या आक्रमक मागणीची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी त्वरित आमदार सत्यजित तांबे यांच्या १५ डिसेंबर २०२५ च्या पत्रानुसार (जा. क्रमांक ९३४) उपवनसंरक्षक, अहिल्यानगर यांच्या कार्यालयामार्फत कुटुंबीयांना १० लाख रुपयांची तातडीची मदत मंजूर केली आहे.

याचबरोबर, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानंतर वनमंत्र्यांनी नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश दिले असून, बिबट्याच्या हल्ल्यातील कुटुंबीयांना मदत आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.

सकाळी आंदोलनामध्ये आक्रमक मागणी करून तातडीने पाठपुरावा करून मदत मिळवून दिल्याबद्दल जवळेकडलग ग्रामस्थ आणि तालुक्यातील नागरिकांनी आमदार तांबे यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 654
बिबट्या हल्ला मदत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर :  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेर शहरासाठी…

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.