Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यात पासपोर्ट घोटाळा उघड; ४ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

जिल्ह्यात पासपोर्ट घोटाळा उघड; ४ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल

या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 17, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर (महाराष्ट्र संवाद न्यूज):

बनावट नाव, पत्ता आणि कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांचा मोठा गैरप्रकार शेवगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, या चौघांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, संबंधित चारही आरोपींनी २०१८ मध्ये शेवगाव शहरात वास्तव्य करून बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण भारतीय नागरिक असल्याचे भासवले आणि पासपोर्ट मिळवला. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध पुरावा आढळून आला नाही.

शुओ कोनक मुस्तुडी, राजु सिद्धार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी व प्रकाश सुनिल चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पासपोर्ट अधिनियम १९६७ चे कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शेवगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 443
पासपोर्ट घोटाळा शेवगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.