Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर हादरलं! जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ‘लुसी’ आणि ‘जंजीर’ने शोधला कोपरा न् कोपरा
गुन्हेगारी

अहिल्यानगर हादरलं! जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ‘लुसी’ आणि ‘जंजीर’ने शोधला कोपरा न् कोपरा

विशेष म्हणजे, केवळ अहिल्यानगरच नव्हे तर राज्यातील इतर अनेक ठिकाणीही अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल एकाच वेळी आल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून हा प्रकार जाणीवपूर्वक गोंधळ उडवण्यासाठी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 18, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: 

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी एका निनावी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आणि सखोल तपासणी केली. मात्र, सुदैवाने काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने हा केवळ एक खोडसाळपणा आणि अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून आता कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे सुरळीत झाले आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर हा धमकीचा संदेश धडकला. यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आणि तातडीने पोलीस विभागाला याची माहिती देण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण सहा मजली इमारत रिकामी करून नागरिकांना बाहेर काढले. यानंतर सुरू झाला तो ‘सर्च ऑपरेशन’चा थरार!

बॉम्ब शोधक पथकातील ‘लुसी’ आणि ‘जंजीर’ या दोन प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या शोधमोहिमेमध्ये इमारतीचे सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग आणि संपूर्ण परिसराचा कोपरा न् कोपरा तपासण्यात आला. या मोहिमेत पोलीस दलाला अग्निशमन दल आणि एसआयडी (SID) पथकाचेही मोलाचे सहकार्य लाभले. तासनतास सुरू असलेल्या या सखोल तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत.

विशेष म्हणजे, केवळ अहिल्यानगरच नव्हे तर राज्यातील इतर अनेक ठिकाणीही अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल एकाच वेळी आल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून हा प्रकार जाणीवपूर्वक गोंधळ उडवण्यासाठी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून केला जात असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 755
अहिल्यानगर कलेक्टर ऑफिस ई-मेल बॉम्ब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.