Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ‘घोट’; अकोल्यात अवैध दारूचा उच्छाद; हेरंब कुलकर्णींचा बैठकीवर बहिष्कार, राजीनाम्याचा इशारा!
प्रशासन

प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ‘घोट’; अकोल्यात अवैध दारूचा उच्छाद; हेरंब कुलकर्णींचा बैठकीवर बहिष्कार, राजीनाम्याचा इशारा!

समिती प्रमुख म्हणून तहसीलदारांनी आता कडक भूमिका घ्यावी, अन्यथा निष्क्रिय समितीमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले (प्रतिनिधी):

अनेक प्रयत्न आणि प्रशासकीय पाठपुरावा करूनही अकोले तालुक्यातील अवैध दारूविक्री थांबत नसल्याने दारूबंदी समितीचे सदस्य तथा प्रसिद्ध समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासकीय यंत्रणेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आदेश देऊनही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा निषेध नोंदवत कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच, पुढील बैठकीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, संगमनेर, ठाणगाव आणि घारगाव येथील दुकानांतून दररोज अकोल्यात अवैध दारूचा पुरवठा होतो. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांना वारंवार सूचित करूनही त्यांनी एकाही वाहनावर कारवाई केली नाही, याचा अर्थ संगमनेर कार्यालय या बेकायदेशीर व्यवसायात सामील असल्याचे स्पष्ट होते. राजूर येथील परिस्थिती तर अधिकच बिकट झाली असून, तेथे नवीन पोलीस अधिकारी पवार रुजू झाल्यापासून दारूविक्री करणारी दुकाने आणि मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेथील पोलीस यंत्रणाच या अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचा खळबळजनक आरोपही कुलकर्णी यांनी केला आहे.

तालुक्यातील लहित, कोतूळ, ब्राम्हणवाडा, लिंगदेव, कळस, समशेरपूर, देवठाण, खिरविरे, इंदोरी फाटा, शाहूनगर, गणोरे, डोंगरगाव, धाम्बोडी फाटा, वीरगाव फाटा, वाकी आणि वारंघुशी यांसारख्या अनेक गावांमध्ये दारूचा उच्छाद सुरूच आहे. विशेष म्हणजे लिंगदेव, पिंपळगाव खांड आणि वीरगाव फाटा येथील महिलांनी एकत्र येऊन दारूचे अड्डे फोडले होते, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा तिथे खुलेआम दारू विक्री सुरू झाली आहे. ग्रामरक्षक दलाच्या निर्मितीबाबत आणि ग्रामसेवकांच्या बैठकीबाबत पाच महिन्यांपासून सूचना देऊनही त्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.

अकोले पोलीस, राजूर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग या संवेदनशील विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगत कुलकर्णी यांनी राजूरचे अधिकारी पवार आणि संगमनेरचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांच्या निलंबनाची मागणी जिल्हा अधीक्षकांकडे केली आहे. समिती प्रमुख म्हणून तहसीलदारांनी आता कडक भूमिका घ्यावी, अन्यथा निष्क्रिय समितीमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा इशारा दिला आहे. या भूमिकेमुळे तालुक्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासनाच्या पुढील पाऊलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 530
अवैध धंदे दारू विक्री दारूबंदी समिती निष्क्रिय प्रशासन राजीनामा हेरंब कुलकर्णी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा…

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.