Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पांढऱ्या स्विफ्टमध्ये काय होतं? तळेगाव-लोणी रस्त्यावर एलसीबीच्या पथकाने कार अडवली आणि समोर आले धक्कादायक वास्तव! ५.७० लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
गुन्हेगारी

पांढऱ्या स्विफ्टमध्ये काय होतं? तळेगाव-लोणी रस्त्यावर एलसीबीच्या पथकाने कार अडवली आणि समोर आले धक्कादायक वास्तव! ५.७० लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) सह भारतीय वन कायदा आणि महाराष्ट्र वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 19, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज:

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चंदनाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने चंदनाची लाकडे घेऊन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारची पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून झडती घेतली. या धडाकेबाज कारवाईत ५ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात अवैध चंदनाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता. 

गुरुवारी (१८ डिसेंबर) एलसीबीचे पथक लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून नाशिकहून चंदनाची लाकडे श्रीरामपूरकडे नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यामुळे या पथकाने संशयित वाहन पकडण्यासाठी तातडीने मोहिम हाती घेतली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तळेगाव ते लोणी रोडवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेंटरसमोर सापळा लावला. काही वेळातच संशयित कार येताना दिसली असता पोलिसांनी तिला इशारा करून थांबवले. कारची झडती घेतली असता पोलिसांना त्यामध्ये ६० हजार रुपये किमतीची ३० किलो चंदनाची लाकडे, ५ लाख रुपयांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी हनुमंता भिमा मोरे (वय ४५, रा. उंबरगांव, ता. श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी केली असता, ही चंदनाची लाकडे त्याने उत्तम नारायण पवार (रा. सिन्नर, जि. नाशिक) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. सध्या मुख्य सूत्रधार उत्तम पवार हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) सह भारतीय वन कायदा आणि महाराष्ट्र वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकातील राहुल द्वारके, भीमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतिश भवर, सुनील मालणकर आणि चालक महादेव भांड यांनी केली आहे. पोलिसांच्या तपासातून पुढे काय समोर येते हे त्या काही दिवसात स्पष्ट होईल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,689
अहिल्यानगर एलसीबी क्राईम गुन्हेगारी चंदन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.