Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेचा ‘महासंग्राम’! तीन जागांसाठी आज मतदान; सेवा समिती की महायुती? उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष
निवडणूक

संगमनेर पालिकेचा ‘महासंग्राम’! तीन जागांसाठी आज मतदान; सेवा समिती की महायुती? उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

सध्याच्या स्थितीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात-आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. या निवडणुकीचे आगामी दूरगामी परिणाम दिसणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/12/2025Updated:20/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर | अनंत पांगारकर
संगमनेर नगरपरिषदेच्या रखडलेल्या तीन जागांसाठी आज (शनिवारी) रणधुमाळी उडाली आहे. या तीन जागांसाठी आज सकाळीच शांततेत मतदान सुरू झाले असून सकाळी साडेनऊ पर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले होते. तर नगराध्यक्षपदासह २७ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले आहे. उद्या रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर संगमनेर शहराच्या स्थानिक राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यात होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निकालातून शहराचा ‘किंग’ कोण ठरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुमारे ११,४२६ मतदार आज ९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार असून, उद्या रविवारी (२१ डिसेंबर) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
या निवडणुकीत प्रामुख्याने संगमनेर सेवा समिती आणि महायुती यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. महायुतीमध्ये फूट पडले असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे काही प्रभागांमध्ये निवडणूक लढविली आहे. आज होत असलेल्या निवडणुकीतही एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला उमेदवार उभी आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीने आपले सर्व उमेदवार ‘सिंह’ चिन्हावर रिंगणात उतरवले आहेत. तर आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) ‘धनुष्यबाण’, भारतीय जनता पक्ष ‘कमळ’ आणि काही प्रभागांमध्ये चिन्हावर न लढता अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे. महायुतीत फोटो पाडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट ‘घड्याळ’ चिन्हावर नशीब आजमावत आहे. याशिवाय यावेळी मोठ्या संख्येने काही अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.
आज शनिवारी पार पडत असलेल्या निवडणुकीतील प्रभागांमधील लढतींचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
प्रभाग १ ब: माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड (सेवा समिती) विरुद्ध अभिजित अरुण पुंड (महायुती) यांच्यात थेट सामना रंगला आहे.
प्रभाग २ ब: येथे तिरंगी लढत होत असून अर्चना दिघे (सेवा समिती), इंदिरा नामन (महायुती) आणि सुवर्णा म्हस्के (राष्ट्रवादी-अजित पवार गट) यांच्यात चुरस आहे.
प्रभाग १५ ब: येथे सेवा समितीच्या नसीमबानो पठाण यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार झुलेखा पठाण आणि दिलशाद शेख यांनी आव्हान उभे केले आहे.
आमदार खताळ यांनी निवडणुकीत थोरात-तांबे गटाला शह देण्यासाठी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे. मात्र संगमनेरकर कोणाच्या पाठीशी उभे राहतात हे रविवारी स्पष्ट होणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात-आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. या निवडणुकीचे आगामी दूरगामी परिणाम दिसणार आहे.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 516
मतदान संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.