Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांनो सावधान! उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय!
निवडणूक

संगमनेरकरांनो सावधान! उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय!

प्रशासनाने सर्व संबंधित उमेदवार, प्रतिनिधी आणि नागरिकांना या नियमांचे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी उद्या रविवारी, (२१ डिसेंबर) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल परिसरात पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने क्रीडा संकुल परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले असून अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मतमोजणीच्या दिवशी सुरक्षिततेच्या कारणास्तव खालील मार्गांवरून सर्व वाहनांना व नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे- 
ईदगाह मैदान ते नेहरू गार्डन: हा संपूर्ण रस्ता मतमोजणीच्या दिवशी बंद राहील.
शहर पोलीस स्टेशन ते संजय गांधी नगर: या दरम्यानचा रस्ता बॅरिकेडिंग करून पूर्णतः बंद असेल.
वकील कॉलनी व अभंग मळा: या भागातून क्रीडा संकुलाकडे येणारे अंतर्गत रस्तेही बंद राहतील.
बॅडमिंटन हॉल कोपरा व गेट नं. १: येथील मार्गांवर बॅरिकेड्स लावून प्रवेश थांबवण्यात येईल.

उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे- 
उमेदवार व प्रतिनिधी: यांच्यासाठी पेटीट कॉलेज आणि सिद्धार्थ हायस्कूल येथे पार्किंगची सोय आहे.
सिद्धार्थ हायस्कूल पार्किंग मार्ग: या पार्किंगकडे जाण्यासाठी केवळ ‘शहर पोलीस स्टेशन ते संजय गांधी नगर ते सिद्धार्थ शाळा गेट’ याच मार्गाचा वापर करावा लागेल.
अधिकारी व कर्मचारी: कवी अनंत फंदी समोरील बेसमेंट, तहसील कार्यालय परिसर आणि त्याजवळील नियुक्त पार्किंगमध्ये त्यांची वाहने लावता येतील.

प्रवेशासाठी कडक नियम
ओळखपत्र अनिवार्य: प्रत्येक व्यक्तीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले वैध ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
प्रतिबंधित वस्तू: मतमोजणी कक्षात मोबाईल फोन, स्वतःचे पेन, कागद किंवा इतर कोणत्याही वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे.
साहित्य पुरवठा: मतमोजणीच्या नोंदीसाठी आवश्यक असणारे पेन आणि रायटिंग पॅड प्रशासनाकडून जागेवरच उपलब्ध करून दिले जाईल.
सुरक्षा तपासणी: कडक पोलीस बंदोबस्त तैनात असून सुरक्षा तपासणीनंतरच प्रवेश दिला जाईल.

सार्वजनिक घोषणांची व्यवस्था
नागरिकांना मतमोजणीची फेरीनिहाय माहिती मिळावी यासाठी प्रशासनाने चार ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा लावली आहे:
१. बॅडमिंटन हॉल बाहेरील परिसर.
२. ईदगाह मैदानाकडील परिसर.
३. क्रीडा संकुल गेट क्रमांक १.
४. संगमनेर शहर पोलीस स्टेशन समोर.

प्रशासनाने सर्व संबंधित उमेदवार, प्रतिनिधी आणि नागरिकांना या नियमांचे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,725
क्रीडा संकुल मतमोजणी रस्ते बंद संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.