Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फिल्मी स्टाईल थरार! पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला; हवालदाराची धावत्या ट्रॅक्टरवर झेप अन् आरोपी जेरबंद
गुन्हेगारी

फिल्मी स्टाईल थरार! पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला; हवालदाराची धावत्या ट्रॅक्टरवर झेप अन् आरोपी जेरबंद

खाली उतरण्याऐवजी त्याने मला अडवलं तर तुमचा ट्रॅक्टरखाली मुडदा पाडील अशी धमकी देत दहशत निर्माण केली आणि थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 25, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज

चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपीने ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि त्यांना वाचवण्यासाठी धावलेला एक नागरिक गंभीर जखमी झाले असून, फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रॅक्टरवर झडप घालून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका टेम्पो चोरीचा (MH 14 AH 369) गुन्हा दाखल असून हा टेम्पो संशयित आरोपी लक्ष्मीकांत काळू मुंजाळ (रा. कमालपूर) याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कर्मचारी अजित पठारे व प्रसाद साळवे यांनी कमलपूर परिसरात सापळा रचला होता.

संशयित आरोपी मुंजाळ हा चक्रधर दूध डेअरीसमोर ट्रॅक्टर घेऊन येत असताना पोलिसांनी त्याला कायदेशीर चौकशीसाठी खाली उतरण्यास सांगितले. मात्र, खाली उतरण्याऐवजी त्याने मला अडवलं तर तुमचा ट्रॅक्टरखाली मुडदा पाडील अशी धमकी देत दहशत निर्माण केली आणि थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला.

या भीषण धडकेत पोलीस कर्मचारी प्रसाद साळवे जमिनीवर कोसळले आणि ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या उजव्या हातावरून गेल्याने ते रक्तबंबाळ झाले. साळवे यांच्या मदतीसाठी धावलेले स्थानिक नागरिक बाबा इमाम सय्यद यांनाही आरोपीने ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली, यात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. ही अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवलेली असताना हवालदार अजित पठारे यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता चालत्या ट्रॅक्टरवर झेप घेतली. त्यांनी चालत्या ट्रॅक्टरचा ब्रेक दाबून तो थांबविला आणि आरोपी मुंजाळ याच्याशी झटापट करत त्याला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निकम ताफ्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपी लक्ष्मीकांत मुंजाळ याला ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यातील वाळूसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे. जखमी पोलीस कर्मचारी साळवे आणि नागरिक बाबा सय्यद यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या थरारक घटनेचे कमालपूरमधील ग्रामस्थ प्रत्यक्ष साक्षीदार ठरले असून पोलिसांनी दाखवलेल्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,046
गुन्हेगारी पोलीस जखमी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.