Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर एलसीबीची पहाटेची धडक कारवाई; संगमनेरात गोवंश कत्तल रॅकेट उघड! ३ टन गोमांस जप्त, १६ जनावरांची सुटका!
गुन्हेगारी

अहिल्यानगर एलसीबीची पहाटेची धडक कारवाई; संगमनेरात गोवंश कत्तल रॅकेट उघड! ३ टन गोमांस जप्त, १६ जनावरांची सुटका!

या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला असून, कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशीय जनावरांची निर्दयतेच्या विळख्यातून सुटका केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज –
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी कारवाया केल्या. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला असून, कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशीय जनावरांची निर्दयतेच्या विळख्यातून सुटका केली आहे.
मदिनानगरमध्ये पहाटेची कारवाई-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक संगमनेर शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना, त्यांना मदिनानगर येथील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला असता, तीन इसम जनावरांची कत्तल करताना मिळून आले. पोलिसांना पाहताच मुख्य आरोपी कासिफ असद कुरेशी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, मात्र पोलिसांनी इतर दोन आरोपींना जागीच ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुलाम फरिद जावेद कुरेशी (वय ३० वर्षे, रा. मोगलपुरा, संगमनेर) आणि मोहंमद वसीम मुबारक अली (वय ३२ वर्षे, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मदिनानगर, संगमनेर) यांचा समावेश आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे ३,११० किलो गोमांस आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी ७०० रुपये किमतीची कुऱ्हाड व सुरी असा एकूण ९ लाख ३० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काटवनात लपवलेली १६ जनावरे मुक्त- या कारवाईनंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोल्हेवाडी रोडवरील हाजीनगर येथील एका काटवनात छापा टाकला. तिथे २ लाख १५ हजार रुपये किमतीची एकूण १६ लहान-मोठी गोवंशीय जनावरे विना चारा-पाणी अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळली. ही जनावरे मुद्दस्सर हाजी कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) याने कत्तलीच्या उद्देशाने आणली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या सर्व जनावरांची सुटका केली असून मुद्दस्सर कुरेशी सध्या फरार आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, आमेल आजबे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 896
अहिल्यानगर एलसीबी कत्तलखाना कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी…

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.