Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू माफियांना गुन्हे शाखेचा ‘शॉक’; घारगावात १० लाखांचा मुद्देमाल जप्त, मुद्देमालासह वाळू तस्कर जाळ्यात!
गुन्हेगारी

वाळू माफियांना गुन्हे शाखेचा ‘शॉक’; घारगावात १० लाखांचा मुद्देमाल जप्त, मुद्देमालासह वाळू तस्कर जाळ्यात!

अधिक चौकशीत हा डंपर चेतन रामनाथ कजबे (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) याच्या मालकीचा असून त्याच्या सांगण्यावरून मुळा नदीपात्रातून ही वाळू चोरून आणल्याची माहिती चालकाने दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली. या कारवाईत मुळा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा १० लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरमध्ये ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी संगमनेर भागात गस्तीवर होते. दरम्यान, बोटा शिवारातील कुरकुंडी फाटा येथे एक अशोक लेलँड कंपनीचा डंपर संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पथकाला मिळाली. पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन डंपरची (क्र. एम.एच. १४ एल.एक्स. ७२९७) तपासणी केली असता, त्यामध्ये १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि २० हजार रुपये किमतीची २ ब्रास चोरटी वाळू असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

यावेळी पोलिसांनी डंपर चालक पिलाजी महादु नंदकर (वय ४१, रा. शेळकेवाडी, ता. संगमनेर) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदर वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले. अधिक चौकशीत हा डंपर चेतन रामनाथ कजबे (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) याच्या मालकीचा असून त्याच्या सांगण्यावरून मुळा नदीपात्रातून ही वाळू चोरून आणल्याची माहिती चालकाने दिली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत शिवाजी आढाव यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धाडसी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, अमोल आजबे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने यशस्वी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 780
अहिल्यानगर एलसीबी कारवाई घारगाव वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.