Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘टायगर अभी जिंदा है!’ अपमानाचा बदला सन्मानाने; श्रीरामपूरच्या राजकारणात करण ससाणेंचा झंझावाती विजय, RGSS कडून विशेष सत्कार
राजकारण

‘टायगर अभी जिंदा है!’ अपमानाचा बदला सन्मानाने; श्रीरामपूरच्या राजकारणात करण ससाणेंचा झंझावाती विजय, RGSS कडून विशेष सत्कार

विरोधकांच्या टिकेला उत्तर देत जनतेनेच आता "टायगर अभी जिंदा है" म्हणत ससाणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. या यशाचे औचित्य साधून राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर –

राजकारणात यश मिळवणे सोपे असते, पण संघर्ष आणि अपमानातून तावून सुलाखून निघत जनमाणसात स्थान निर्माण करणे कठीण असते. श्रीरामपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाची दखल घेत राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने त्यांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.

करण ससाणे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केल्यास, त्यांची ही वाटचाल अतिशय खडतर राहिली आहे. अनुराधा आदिक नगराध्यक्ष असताना करण ससाणे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते. राजकारणात नवखे असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला; त्यांचे वडील आणि आधारस्तंभ माजी आमदार जयंतराव ससाणे यांचे निधन झाले. या दुखाच्या काळात सावरत असतानाच त्यांना राजकीय अपमानालाही सामोरे जावे लागले. उपनगराध्यक्ष असूनही त्यांना हक्काचे केबिन नाकारले गेले. हा केवळ प्रशासकीय अडथळा नव्हता, तर त्यांना राजकीयदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न होता.

वडील गेल्यानंतर अनेक जुने सहकारी आणि दिग्गज शिलेदार गट सोडून गेले. ससाणेंकडे आता कुणीच उरले नाही, अशी कुचेष्टा विरोधकांनी सुरू केली होती. मात्र, डगमगून न जाता करण ससाणे यांनी माघार घेण्याऐवजी आपला लोकसंपर्क वाढवण्यावर भर दिला. निवडणुकीच्या काही महिने आधी जवळपास सर्वच मोठे चेहरे दुसऱ्या पक्षात गेले असतानाही, ससाणे यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर विजयाचा पाया रचला.

इतर पक्षांनी प्रचार सुरू करण्यापूर्वीच करण ससाणे यांनी संपूर्ण श्रीरामपूर शहर तीन वेळा पालथे घातले होते. प्रत्येक वॉर्ड, गल्ली आणि सोसायटीत जाऊन त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. त्यांच्या या प्रामाणिक मेहनतीला श्रीरामपूरच्या जनतेने कौल दिला. ज्या ठिकाणी एकेकाळी त्यांना बसायला खुर्ची नाकारली गेली होती, आज त्याच नगरपालिकेची संपूर्ण सत्ता जनतेने ससाणे यांच्या स्वाधीन केली. दिग्गज सोडून गेले तरी निष्ठावान आणि नवख्या कार्यकर्त्यांनी दिलेली साथ या विजयात मोलाची ठरली.

विरोधकांच्या टिकेला उत्तर देत जनतेनेच आता “टायगर अभी जिंदा है” म्हणत ससाणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. या यशाचे औचित्य साधून राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सतीश खताळ, राम अरगडे, अमोल शेलकर, अरुण चव्हाण, कल्याण जोर्वेकर, प्रकाश कडलग यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 682
RGSS आरजीएसएस करण ससाने राहुल गांधी समर्थक संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.