Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात ‘क्रेडिट वॉर’चा भडका! थोरातांच्या कामांवर विखे-खताळांनी मारला डल्ला? अजय फटांगरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
राजकारण

संगमनेरात ‘क्रेडिट वॉर’चा भडका! थोरातांच्या कामांवर विखे-खताळांनी मारला डल्ला? अजय फटांगरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

थोरातांच्या कष्टावर आणि पाठपुराव्यावर स्वतःची पाटी लावण्याचा हा प्रकार राजकीय दिवाळखोरी दर्शवणारा आहे. संगमनेरची जनता सुज्ञ असून सत्य परिस्थिती त्यांना पूर्णपणे माहित आहे, त्यामुळे अशा निवडणुकीच्या 'स्टंटबाजी'ला लोक बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2025Updated:27/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी:

संगमनेर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले असून विकासकामांच्या श्रेयावरून आता थेट ‘क्रेडिट वॉर’ सुरू झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात ज्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे, ती सर्व कामे मुळात लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेली आहेत. हा सर्व प्रकार निव्वळ ‘स्टंटबाजी’ असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, अशी घणाघाती टीका संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वागण्यामुळे संगमनेरच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला छेद दिला जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

अजय फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवताना पुराव्यांचा पाढाच वाचला आहे. ते म्हणाले की, मालदाड येथे ज्या १७ कोटींच्या रस्त्याचे उद्घाटन झाले असे मिरवले जात आहे, त्या जाहिरातीत हा रस्ता ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’चा असल्याचे म्हटले आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्ता ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’तून मंजूर झाला असून या कामाची खरी किंमत १७ कोटी नसून १९ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे ६ मार्च २०२३ रोजी जेव्हा या कामाला मंजुरी मिळाली, तेव्हा अमोल खताळ आमदारही नव्हते. ज्यांना कामाची योजना आणि खरी किंमतही माहित नाही, त्यांनी श्रेयासाठी अशी ‘नौटंकी’ करणे हास्यास्पद असल्याचे फटांगरे यांनी म्हटले आहे. केवळ आकड्यांची धूळफेक करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तालुक्यातील इतर कामांचा संदर्भ देताना फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांमधील हवाच काढून घेतली. पिंपरणे येथील पिंपरणे ते कोळवाडे शिरापूर हा रस्ता बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ८ मार्च २०२३ रोजी मंजूर झाला होता. अमोल खताळ आमदार होण्यापूर्वीच हे काम पूर्ण झाले असताना, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यावर त्याचे पुन्हा उद्घाटन कशासाठी केले जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच शेंडेवाडी ते हिवरगाव पठार हा रस्ता २१ जुलै २०२३ रोजी थोरातांच्या मागणीनुसार मंजूर झाला होता, त्यावेळीही खताळ यांच्याकडे आमदारकी नव्हती. इतकेच नाही तर ग्रामपंचायतींनी स्वतःच्या तुटपुंज्या निधीतून केलेल्या छोट्या कामांचे श्रेयही आमदार लाटत असल्याचे धक्कादायक वास्तव फटांगरे यांनी समोर आणले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सर्व ‘बनवाबनवी’ सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. वर्षभर हातात सत्ता आणि राज्याचे मंत्रिपद असताना तालुक्यासाठी कोणतेही ठोस नवीन काम उभे करता आले नाही, म्हणून आता जुन्याच कामांच्या फिती कापून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत. ज्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडले, त्यांचीही आमदार खताळ यांनी दिशाभूल केली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील फरकही ज्यांना समजत नाही, त्यांनी जनतेचे नेतृत्व करण्याची भाषा करू नये, असा टोलाही फटांगरे यांनी लगावला.

शेवटी आपली नाराजी व्यक्त करताना अजय फटांगरे म्हणाले की, आमदार महोदयांनी स्वतःच्या कर्तृत्वावर नवीन निधी आणावा आणि विकासकामे करावीत, आमचा त्याला कधीच विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, थोरातांच्या कष्टावर आणि पाठपुराव्यावर स्वतःची पाटी लावण्याचा हा प्रकार राजकीय दिवाळखोरी दर्शवणारा आहे. संगमनेरची जनता सुज्ञ असून सत्य परिस्थिती त्यांना पूर्णपणे माहित आहे, त्यामुळे अशा निवडणुकीच्या ‘स्टंटबाजी’ला लोक बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,038
अजय फटांगरे अमोल खताळ क्रेडिट वॉर बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे विकास कामे श्रेयवाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.