Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सावधान! संगमनेरमध्ये गोवंश तस्करीचा नवा पॅटर्न? १० टायर कंटेनरमधून कत्तलीसाठी चालली होती जनावरांची वाहतूक… २८ जनावरांची सुटका; ३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, कर्नाटकच्या चालकाला अटक
गुन्हेगारी

सावधान! संगमनेरमध्ये गोवंश तस्करीचा नवा पॅटर्न? १० टायर कंटेनरमधून कत्तलीसाठी चालली होती जनावरांची वाहतूक… २८ जनावरांची सुटका; ३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, कर्नाटकच्या चालकाला अटक

प्राथमिक चौकशीत ही जनावरे आरबाज राजू शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) याच्या मालकीची असून ती कर्नाटकला कत्तलीसाठी नेली जात असल्याचे समोर आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/12/2025Updated:31/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

पुणे-नाशिक महामार्गावरून कंटेनरमध्ये अत्यंत निर्दयतेने कोंडून कत्तलीसाठी कर्नाटककडे नेली जाणारी २८ गोवंश जातीची जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका १० टायर कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीने या संबंधीची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना दिली. पोलीस उपअधीक्षक सोनवणे यांच्या सूचनेवरून पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे आदी पोलिसांनी संगमनेर ते पुणे रोडवर गस्त सुरू केली.

पहाटे ४.३० च्या सुमारास हिवरगाव पावसा टोलनाक्याच्या पुढे जावळे वस्तीजवळ नाशिक-पुणे हायवेवर संशयास्पद वाटणारा कंटेनर (क्रमांक KA-51 B-8920) पोलिसांनी अडवला. सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यात जनावरे असल्याचे त्याने कबूल केले.

पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता, त्यात २८ गोवंश जातीचे बैल कत्तलीच्या उद्देशाने दाटीवाटीने कोंडलेले आढळले. या जनावरांची एकूण किंमत १२ लाख ६० हजार रुपये आहे, तर २० लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर असा एकूण ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक सय्यद रिजवान दस्तगीर (वय ३२, रा. होले नरसिंगपूर, हसन, कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत ही जनावरे आरबाज राजू शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) याच्या मालकीची असून ती कर्नाटकला कत्तलीसाठी नेली जात असल्याचे समोर आले आहे.

आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे अधिनियम (३, ११) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ च्या सुधारित कलमान्वये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जनावरांची सुटका करून त्यांना जीवदया गोरक्षक संस्था, पांजरपोळ (सायखिंडी फाटा) येथे सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,377
कंटेनर कत्तलखाना गोवंश कारवाई जिवंत गोवंश जनावरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.