Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रियकराने दिला दगा, नैराश्यातून आयटी इंजिनिअर तरुणीची आत्महत्त्या!
गुन्हेगारी

प्रियकराने दिला दगा, नैराश्यातून आयटी इंजिनिअर तरुणीची आत्महत्त्या!

मृत तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे

एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रियकराने केलेल्या फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्या कुटुंबीयांना या नात्याबद्दल सांगून लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबाचाही या विवाहाला होकार होता. मात्र, मे महिन्यात अचानक प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगत तिची फसवणूक केली.

प्रियकराने केवळ आपला वापर केल्याचे समजल्याने ही तरुणी तीव्र मानसिक तणावाखाली होती. भावाने तिला समजावून सांगण्याचा आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती प्रचंड नैराश्यात होती.

दरम्यान, मुठा नदीपात्रात या तरुणीचा मृतदेह आढळून आला. खराडी पोलिसांनी तरुणीच्या भावाला संपर्क साधल्यानंतर या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. प्रियकराने केलेल्या विश्वासघातामुळेच बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप करत भावाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी चप्पल विक्रेत्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कुटुंबीयांनी धीर देण्याचा प्रयत्न करूनही तरुणीने मृत्यूचा मार्ग निवडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,005
आत्महत्या आयटी तरुणी चप्पल विक्रेता प्रेम संबंध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.