लाखाची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक नाशिकमधून अटक; पदोन्नती होऊन बदली होताच एसीबीची कारवाई
नुकतीच त्याची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती आणि त्याची नाशिक येथे बदलीही करण्यात आली होती.

अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास गांगुर्डे याच्याकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी त्याने सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर, पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या संभाषणादरम्यान एक लाख रुपये लाच घेण्याचे तडजोडीअंती निश्चित झाले.
याप्रकरणी गांगुर्डेविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक छाया देवरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
