Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विद्युत रोहित्रातील कॉपर चोरणारी टोळी जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एलसीबीची कारवाई
गुन्हेगारी

विद्युत रोहित्रातील कॉपर चोरणारी टोळी जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एलसीबीची कारवाई

एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, विजय पवार, संतोष खैरे, गणेश लोंढे, फुरखान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डिले, महादेव भांड यांच्या पथकाने ही कामगिरी केली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर: राजूर आणि अकोले परिसरातील विद्युत रोहित्रांमधील कॉपरची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे कॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १५,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये कोहंडी (ता. अकोले) येथील धरणाजवळील एक विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी उघडून त्यातील ३,५०,००० रुपये किमतीची कॉपर चोरून नेली होती. याप्रकरणी स्वप्नील सुरेश कोकणे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अकोले परिसरात अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात समांतर तपास सुरू केला होता. तपासादरम्यान तांत्रिक कौशल्याच्या आधारे सुखरुप सुखदेव नांगरे (रा. हिवरे तर्फे, जि. पुणे) याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सुखरुप नांगरे याला नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने चोरीचा माल पुणे येथील एका भंगार दुकानदाराला विकल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी सुखरुप सुखदेव नांगरे (वय २४, रा. हिवरे तर्फे, पुणे), सागर शिवराम जाधव (रा. महाळुंगे पडवळ, पुणे), शैलेश बाळू पारधी (रा. महाळुंगे पडवळ, पुणे) आणि चोरीचा माल घेणारा मोहंमद तल्हा मोहंमद जुबेर (रा. वाल्हेकरवाडी, पुणे) यांना अटक केली आहे. या टोळीकडून ६५,००० रुपयांचे कॉपर आणि १५ लाख रुपयांची इनोव्हा कार (क्र. MH 12 EX 4340) जप्त करण्यात आली आहे. तसेच या टोळीतील भास्कर केवळ (रा. निमदरी, जुन्नर) आणि सुनील खंडागळे (रा. जवळके, खेड) हे दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या टोळीच्या अटकेमुळे राजूर पोलीस ठाण्यातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, विजय पवार, संतोष खैरे, गणेश लोंढे, फुरखान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डिले, महादेव भांड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपींना पुढील तपासासाठी राजूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 781
अहिल्यानगर एलसीबी कॉपर चोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.