Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जादुटोणा आणि संमोहनाच्या जाळ्यात कुटुंब; ५ लाखांची रोकड आणि दागिने लंपास, भोंदू बाबावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

जादुटोणा आणि संमोहनाच्या जाळ्यात कुटुंब; ५ लाखांची रोकड आणि दागिने लंपास, भोंदू बाबावर गुन्हा दाखल

घारगांव पोलिसांनी याप्रकरणी बाळासाहेब पोटे आणि सिंधु बाळासाहेब पोटे यांच्या विरुद्ध 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३' च्या कलम २(ब) आणि ३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

जादुटोणा करून ‘सर्व चांगले करून देतो’ असे आमिष दाखवून एका कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संमोहनाचा वापर करून आरोपीने फिर्यादीच्या आईकडून सुमारे ५ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि पशुधन लांबवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत खुर्द (हाळदा वस्ती) येथील रहिवासी शरद कैलास डोंगरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सन २०१४ मध्ये आरोपी बाळासाहेब पोटे आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादीच्या घरी जाऊन ‘तुमचं सर्व चांगलं करतो’ असे सांगून जादुटोणा करण्याच्या बहाण्याने ५ हजार रुपये आणि एक बकरी नेली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या आईशी संपर्क वाढवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले.

२०१५ मध्ये आरोपीने फिर्यादीच्या आईला संमोहित करून १,५०,००० रुपये घेतले. जुलै २०२५ मध्ये देखील आश्रमाच्या नावाखाली धान्य आणि रोकड नेण्यात आली. कालांतराने घरात तपासणी केली असता आईचे आणि भावजयीचे मिळून १,४९,२५५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गहाळ असल्याचे आढळले. तसेच, घरातील हिशोबात ५,००,००० रुपयांहून अधिक रक्कम कमी दिसून आली. आईने हे दागिने आणि पैसे बाळासाहेब पोटे याला दिल्याची कबुली दिली आहे.

या प्रकाराबाबत घरात विचारणा केली असता, फिर्यादीच्या आईने सर्वांना मारहाण करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहिल्यानगर येथील डॉ. करंदीकर हॉस्पिटलमध्ये मानसोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मानसिक संतुलन बिघडलेले असतानाही त्या आजही आरोपीच्या संपर्कात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घारगांव पोलिसांनी याप्रकरणी बाळासाहेब पोटे आणि सिंधु बाळासाहेब पोटे यांच्या विरुद्ध ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३’ च्या कलम २(ब) आणि ३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. २ जानेवारी २०२६ रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गंधाले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,425
घारगाव पोलीस जादूटोणा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.