Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नायलॉन मांजा विरोधात संगमनेर शहर भाजप आक्रमक; कारवाई न झाल्यास स्वतः करणार ‘ही’ कृती!
सामाजिक

नायलॉन मांजा विरोधात संगमनेर शहर भाजप आक्रमक; कारवाई न झाल्यास स्वतः करणार ‘ही’ कृती!

निवेदन देताना भाजपचे जिल्हा सचिव सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, मुकुंद उपरे, दिनेश सोमाणी, हर्षवर्धन खुळे, कल्पेश पोगुल, योगेश सूर्यवंशी, जगन्नाथ शिंदे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2026Updated:08/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: प्रतिनिधी

मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच संगमनेर शहरात नायलॉन मांजामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या चार-पाच गंभीर घटनांमुळे नागरिक संतप्त झाले असून, आता याविरोधात संगमनेर शहर भाजप आक्रमक झाली आहे. बंदी असलेल्या नायलॉन आणि चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या गळ्याला, कानाजवळ नायलॉन मांजा अडकून गळा, कान कापला जाण्याचे प्रकार घडले आहेत. नायलॉन मांजावर शासनाची बंदी असूनही शहरातील काही दुकानदार छुप्या पद्धतीने याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप कार्यकर्त्यानी शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि नगरपालिका मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन दिले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग आणि मांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, नायलॉन मांजामुळे गळ्याला इजा झाल्यास प्राणघातक दुर्घटना घडू शकते, त्यामुळे प्रशासनाने तत्काळ मांजा विक्रेत्यांच्या दुकानांवर धाडी टाकून अवैध साठा जप्त करावा.

युवा कार्यकर्ते कल्पेश पोगुल यांनी आपला अनुभव सांगताना नमूद केले की, दोन दिवसांपूर्वी ते आपल्या लहान पुतण्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना मांजा त्यांच्या पुतण्याच्या गळ्याला अडकला होता. सुदैवाने वेळीच लक्ष गेल्याने मोठी दुर्घटना टळली. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी सावधानता बाळगावी आणि लहान मुलांना गाडीवर पुढे बसवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रशासनाने जर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांविरोधात भाजप कार्यकर्ते स्वतः कारवाई करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना भाजपचे जिल्हा सचिव सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, मुकुंद उपरे, दिनेश सोमाणी, हर्षवर्धन खुळे, कल्पेश पोगुल, योगेश सूर्यवंशी, जगन्नाथ शिंदे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 331
नायलॉन मांजा निवेदन भाजप संगमनेर शहर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.