Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त १०१ जणांचे रक्तदान; ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ – बाळासाहेब थोरात
सामाजिक

भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त १०१ जणांचे रक्तदान; ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ – बाळासाहेब थोरात

मोहनराव मस्के यांनी या शिबिरात आपले रक्तदान केले, जे त्यांच्या आयुष्यातील १०१ वे रक्तदान ठरले. कारखान्याचा १०१ रक्तदात्यांचा आकडा आणि मस्के यांचे वैयक्तिक १०१ वे रक्तदान या योगायोगाबद्दल बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कारखान्याच्या अतिथीगृहात अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १०१ बाटल्या रक्ताचे संकलन केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, विज्ञानाने आज सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली असली, तरी रक्ताची कृत्रिम निर्मिती करणे अद्याप मानवाला शक्य झालेले नाही. वाढते अपघात आणि विविध आजारांमुळे रक्ताची मोठी गरज भासत असून, राज्यात अनेकदा रक्ताचा तुटवडा जाणवतो. अशा परिस्थितीत कुणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे, कारण रक्तदान हेच जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे.

या रक्तदान शिबिरात एक आगळावेगळा योगायोग जुळून आला. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांनी या शिबिरात आपले रक्तदान केले, जे त्यांच्या आयुष्यातील १०१ वे रक्तदान ठरले. कारखान्याचा १०१ रक्तदात्यांचा आकडा आणि मस्के यांचे वैयक्तिक १०१ वे रक्तदान या योगायोगाबद्दल बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेली सामाजिक बांधिलकीची शिकवण सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी आजही मनापासून जपतात. याच संस्कारामुळे दरवर्षी कर्मचारी वर्ग स्वतःहून या सामाजिक उपक्रमात सहभागी होतो.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर सेक्रेटरी किरण कानवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी संचालक विजय राहणे, मदन आंबरे, योगेश भालेराव, अरुण वाकचौरे, गुलाब देशमुख, कार्यालयीन अधीक्षक कृष्णा दिघे, अनिल पाटोळे यांच्यासह अर्पण रक्तपेढीच्या प्रियांका वनवे, धनाजी माने, श्रद्धा जोगदंड, ज्ञानेश्वर खैरनार आणि कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 497
थोरात कारखाना बाळासाहेब थोरात रक्तदान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.