Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पोलिसांचे धिंडवडे! IG पथकाचा हॉटेल ‘रानवारा’वर छापा; १७ जुगाऱ्यांना पत्त्यांसह ठोकल्या बेड्या, ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक पोलिसांच्या नाकाखाली जुगाराचा बाजार; वरिष्ठ पथकाच्या कारवाईने खळबळ!
गुन्हेगारी

संगमनेर पोलिसांचे धिंडवडे! IG पथकाचा हॉटेल ‘रानवारा’वर छापा; १७ जुगाऱ्यांना पत्त्यांसह ठोकल्या बेड्या, ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक पोलिसांच्या नाकाखाली जुगाराचा बाजार; वरिष्ठ पथकाच्या कारवाईने खळबळ!

या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असले तरी, स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. आता तरी पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांविरुद्ध ठोस पावले उचलणार की पुन्हा 'आशीर्वाद' सत्र सुरूच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
विविध अवैध धंद्यांनी वेढलेल्या संगमनेरमध्ये आता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सांगवी गावातील ‘हॉटेल रानवारा’ येथे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) पथकाने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या धडक कारवाईत १७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे अक्षरशः ‘पितळ’ उघडे पडले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे, त्या आरोपींची नावे अशी, अंकुश मधुकर नालकर (रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), संदिप गंगाधर भरीतकर (रा. भरीतकरमळा, अकोले नाका, संगमनेर), भाऊसाहेब दत्तु फरगडे (रा. निमगाव, ता. संगमनेर), संदिप विद्याधर दारोळे (रा. केळी रुंभोडी, ता. अकोले), अमोल रघुनाथ पांडे (रा. नवलेवाडी, ता. अकोले), प्रभाकर सखाराम कोटकर (रा. कुंभेफळ, ता. अकोले), आनंद देवराम सारोक्ते (रा. चिरेबंदी, ता. अकोले), सागर रमेश कानवडे (रा. निमगाव बु., ता. संगमनेर), सुधीर प्रकाश बनकर (रा. धांदरफळ, ता. संगमनेर), राजेश मल्लु गायकवाड (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर), बाबासाहेब बाबुराव चौधरी (रा. गणोरे, ता. अकोले), सुनील केशव धात्रक (रा. अशोक चौक, संगमनेर), विक्रम मधुकर नालकर (रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), सुनील प्रभाकर वाडेकर (रा. वाडेकर, संगमनेर), सतीश गुलाब वाळुंज (रा. कोल्हेवाडी, संगमनेर), अफजलखान अन्सार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) आणि अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपुर, ता. अकोले)
संगमनेर तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली आहे. तालुक्यात शहर, तालुका, आश्वी आणि घारगाव अशी चार-चार पोलीस स्टेशन असूनही आणि उपअधीक्षक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी तैनात असतानाही अवैध कत्तलखाने, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, ढाबे हॉटेलवर मिळणारी बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, मटका अड्डे, जुगार अड्डे, ड्रग्स विक्री, हवाला व्यवहार राजरोसपणे सुरू आहे. 
सांगवीसारख्या गावात हॉटेलमध्ये एवढा मोठा जुगाराचा बाजार भरत असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नसावी, हे आश्चर्यकारक आहे. हे दुर्लक्ष आहे की अर्थपूर्ण संगनमत, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
जेव्हा जेव्हा तालुक्यात एखादी मोठी कारवाई होते, ती नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाकडूनच केली जाते. एरवी जिल्ह्यात कारवाईचा बागुलबुवा करणारे अहिल्यानगर एलसीबीचे पथक, स्थानिक चारही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय काम करतात? असा रोखठोक प्रश्न आता विचारला जात आहे.
या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असले तरी, स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. आता तरी पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांविरुद्ध ठोस पावले उचलणार की पुन्हा ‘आशीर्वाद’ सत्र सुरूच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,556
जुगार कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सांगवी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.