Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘लाडकी बहीण’ योजनेत तांत्रिक चुकीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा संधी द्या; आमदार अमोल खताळ यांची मागणी
राजकारण

‘लाडकी बहीण’ योजनेत तांत्रिक चुकीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा संधी द्या; आमदार अमोल खताळ यांची मागणी

लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक त्रुटी किंवा मानवी चुकांमुळे कोणतीही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे.

आमदार खताळ यांनी निवेदनात नमूद केले आहे की, त्यांच्या संगमनेर मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील अनेक लाभार्थी महिलांकडून या योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने ई-केवायसी प्रक्रिया करताना अनेक महिलांकडून अज्ञानामुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे ‘घरामध्ये शासकीय कर्मचारी आहे’ हा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे संबंधित महिलांना ‘शासकीय कर्मचारी’ असा नकार संदेश प्राप्त होत असून, पात्र असूनही त्या योजनेपासून वंचित राहत आहेत. वास्तव पाहता, या महिलांच्या कुटुंबात कोणताही शासकीय कर्मचारी नसताना केवळ माहितीअभावी झालेल्या चुकीच्या निवडीमुळे त्यांना अपात्र ठरवले जात आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी, ज्या महिलांना ‘शासकीय कर्मचारी’ पर्याय निवडल्यामुळे नकार मिळाला आहे, त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची विशेष संधी देण्यात यावी. तसेच ज्या पात्र महिलांची ई-केवायसी प्रक्रिया विविध कारणांमुळे अद्याप प्रलंबित आहे, त्यांना आवश्यक मुदतवाढ देऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती खताळ यांनी केली आहे. ज्या पात्र भगिनींचे आर्थिक सहाय्य तांत्रिक कारणांमुळे थांबले आहे, ते देखील तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक त्रुटी किंवा मानवी चुकांमुळे कोणतीही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये, ही शासनाचीही भूमिका असल्याचे सांगत यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 411
अमोल खताळ केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस…

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.