Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य समाजकारणासाठी दिशादर्शक : बाळासाहेब थोरात
सामाजिक

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य समाजकारणासाठी दिशादर्शक : बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्यात गावोगावी प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा; अमृत उद्योग समूहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर अभिवादन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्य युद्धात उडी घेऊन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्या तत्त्वांची मूल्ये जपत निष्ठा, शिस्त, काटकसर आणि नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते निर्माण केले. सहकार, शेती, शिक्षण, समाजकारण आणि पर्यावरण या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सोलापूर येथील सतीशचंद्र देशमुख, महेश देशमुख, पंजाबच्या महिला सेवा दलाच्या प्रदेशाध्यक्ष ऋतुजा देशमुख, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, भाऊसाहेबांनी आयुष्यभर आपल्या तत्त्वांची जपणूक केली. सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध संस्थांची उभारणी केली व त्यात पारदर्शकता आणि शिस्त रुजवली. राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या विकासासाठी असते हा मंत्र त्यांनी दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस व इंदिरा गांधी ही त्यांची प्रेरणादायी व्यक्तिमत्वे होती. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी दंडकारण्य अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ राज्याला दिली. त्यांच्या याच आदर्श विचारांवर संगमनेरची वाटचाल सुरू असल्याने आज येथील सहकार देशात अग्रगण्य ठरला आहे.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भाऊसाहेबांना ‘सहकारातील संत’ संबोधले. शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केले व कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांचाच वारसा घेऊन आज बाळासाहेब थोरात काम करत असून सर्वांनी या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सोलापूरच्या मंगल उद्योग समूहाचे सतीशचंद्र देशमुख यांनी संगमनेरचा सहकार हा पश्चिम महाराष्ट्रासाठी मॉडेल असल्याचे सांगितले.

१२ जानेवारी रोजी होणारा हा ‘प्रेरणा दिन’ संगमनेर तालुक्यातील गावे व वाड्यांवर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने गावोगावी प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, वकृत्व व निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर, विविध क्रीडा स्पर्धा, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रिकेट स्पर्धा आणि कृषी प्रदर्शन यांसारखे भरगच्च कार्यक्रम राबवून ग्रामस्थांनी व सहकारी संस्थांनी भाऊसाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे आभार व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 787
अभिवादन जयंती बाळासाहेब थोरात भाऊसाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.