संगमनेर:
तालुक्यातील जोर्वे परिसरात अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,५९,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल गंगाधर बोरकर (वय ५६, रा. नवीन गावठाण, जोर्वे) हे दि. १० जानेवारी २०२६ च्या संध्याकाळी ६ ते दि. ११ जानेवारी २०२६ च्या सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घरी नसताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने बोरकर यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील शोकेसमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम लंपास केली.
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ७६,००० रुपयांची रोकड, ५०,००० रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत व मणी मंगळसूत्र, १८,००० रुपये किमतीचे ९ ग्रॅम वजनाचे कानातले वेल व झुबे, ८,००० रुपये किमतीची सोन्याची लहान मुलांची चेन, ५,००० रुपये किमतीची चांदीची चेन आणि २,००० रुपये किमतीचे सोन्याचे मणी असा एकूण १ लाख ५९ हजार रुपयांचा माल समाविष्ट आहे.
या घटनेबाबत अनिल बोरकर यांनी दि. १२ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा रजि. नं. २०/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संगमनेरमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास; तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.