Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तीर्थरूप भाऊसाहेब थोरात… दादांसोबतच्या सुंदर आठवणींचा सुवर्णबंध!
महाराष्ट्र संवाद विशेष

तीर्थरूप भाऊसाहेब थोरात… दादांसोबतच्या सुंदर आठवणींचा सुवर्णबंध!

मी नवीन आहे आणि तिथे एकटाच आहे, हे त्या जाणत्या राजाने ओळखले होते. मला कामाचा ताण येऊ नये म्हणून त्यांनी एक युक्ती केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
नक्की तारीख आठवत नाही, पण तो २००६ चा काळ होता. शिक्षणाचे दिवस होते आणि मी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहामध्ये रात्रपाळीत काम करत होतो. कामाला लागून जेमतेम १०-१२ दिवस झाले असावेत. एक दिवस अचानक कामाचे नियोजन बदलले आणि गेस्ट हाऊस इन्चार्ज थिटमे साहेबांनी मला सांगितले, “तुला आज नाईट शिफ्ट करून उद्याची जनरल ड्युटीही सांभाळायची आहे.” मी होकार दिला.
रात्रभर जागून सकाळी पुन्हा कामासाठी सज्ज झालो. साधारण साडेनऊची वेळ असेल, एका गाडीचा हॉर्न वाजला. मी धावतच बाहेर गेलो आणि गाडीचा दरवाजा उघडला. समोर साक्षात आदरणीय भाऊसाहेब थोरात (दादा) उभे होते! त्यांना इतक्या जवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ.
पांढऱ्या रंगाची दिमाखदार ‘ॲम्बेसिडर’ गाडी आणि हातात काठी घेऊन आधार घेत चालणारे दादा… आजही ते चित्र डोळ्यासमोर लख्ख उभे राहते. अतिथीगृहातच दादांचे कार्यालय होते. कार्यालयात शिरताना समोरच माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचा एक बोलका उभा फोटो होता, त्याला वंदन करून दादा आपल्या खुर्चीकडे सरकले.
त्यांच्या भेटीसाठी पठार आणि डोंगराळ भागातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते आले होते. अंगात धोतर आणि डोक्यावर मोठा पांढरा फेटा… दादांचे हे सर्व निष्ठावंत पाईक!
खुर्चीवर बसताच दादांनी टेबलवरील बेल वाजवली. तो आवाज ऐकून माझी छाती धाकधूक करू लागली. मी नवीन होतो, त्यात दादांसारखं मोठं व्यक्तिमत्त्व समोर! मी हळू पावले टाकत आत गेलो. दादांनी माझ्याकडे पाहिले आणि क्षणार्धात माझ्या मनातील धाकधूक ओळखली. त्यांनी प्रेमाने मला जवळ बोलावले आणि म्हणाले, “घाबरू नको, माझ्याजवळ उभा राहा.”
त्यांनी माझं नाव आणि गाव विचारलं. मी अडखळत उत्तर दिलं, “गाव काकडवाडी.” गावाचे नाव ऐकताच दादांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. त्यांनी माझ्या पाठीवर मायेची थाप मारली आणि म्हणाले, “तू तळेगावच्या दुष्काळी पट्ट्यातून आला आहेस, जिद्दीने आणि चांगले काम कर!”
मी नवीन आहे आणि तिथे एकटाच आहे, हे त्या जाणत्या राजाने ओळखले होते. मला कामाचा ताण येऊ नये म्हणून त्यांनी एक युक्ती केली. ते म्हणाले, “एका वाटीत साखर घेऊन ये आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या हातावर थोडी-थोडी साखर दे.”
मला सुरुवातीला काही कळेना, पण नंतर लक्षात आले की, मी गडबडून जाऊ नये म्हणून त्यांनी मला थेट चहा बनवण्याच्या कामात न जुंपता आधी सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली होती. हीच ती दादांची ‘माणुसकी’ आणि कामाची शिस्त!
त्यानंतरच्या काळात अनेकदा त्यांचा फोन यायचा, संवाद व्हायचा. दादा कडक शिस्तीचे होते हे खरं, पण त्या शिस्तीच्या मागे प्रत्येक घटकाबद्दल वाटणारी अपार ओढ आणि माया होती. एका सामान्य मुलाला त्यांनी दिलेला हा शब्दरूपी आधार माझ्या आयुष्याची मोठी शिदोरी ठरला.
आज आदरणीय तीर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांची १०२ वी जयंती. या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस आणि थोर कर्तृत्वास माझे कोटी-कोटी प्रणाम!
— विशाल काळे
(सोशल मीडिया समन्वयक, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 666
भाऊसाहेब थोरात विशाल काळे विशेष लेख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.