Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख — छत्रपती शिवरायांचे दुष्मन
विश्लेषण

रविवार विशेष लेख — छत्रपती शिवरायांचे दुष्मन

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/05/2026No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

छत्रपती शिवरायांचे गुरू कोण? ते शिवकालीन लढायांचे सूत्रधार कोण? याविषयींच्या वायफळ चर्चा घडवून आणणार्‍या बुवा आणि बाबांचा कोण सुळसुळाट सध्या देशाभर आहे. येनकेन प्रकारेन छत्रपतींच्या मागे त्यांच्या पुण्याईला किंमत न देण्याची ही स्पर्धा होय. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा जो काही पराक्रम केला तो ब्राह्मणांच्या सहभागाशिवाय नव्हता, असं दाखवण्याची सुरू असलेली अहमहिका ही केवळ छत्रपतींची बदनामीच नव्हे, तर त्यांना कमी लेखण्यासाठी केलेला कटच होय. शिवरायांविषयी गरळ ओकणार्‍यांबाबत सत्ताधारी सातत्याने मूग गिळून राहिल्याने त्याचा गैरफायदा देशातील शिवरायांच्या द्वेषींनी घेतला. वादग्रस्त टिपण्ण्या करायच्या आणि सत्ताधार्‍यांना अडचणीत आणणार्‍या वातावरणापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न होय. मग कधी राज्यपाल यावर बोलत, तर कधी मंत्री. कधी प्रवक्ता सुधांशी बोलत तर कधी कोरटकर बडबडे. गायकवाडांसारखा वाचाळही बोलत असताना सत्ताधारी मूग गिळू आहेत. याचा फायदा बागेश्‍वर, स्वरूप नामक भोंदू घेणार नाहीत असं थोडीच आहे? छत्रपतींविषयी काल्पनिक बाबी पुढे करत महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न या दोघांनी केलाय. 

नागपूरच्या एका कार्यक्रमादरम्यान बागेश्‍वर नावाच्या भोंदू बाबाने शिवाजी महाराज लढाई करून थकले आणि त्यांनी डोक्यावरील जिरेटोप म्हणे रामदासांच्या पायावर ठेवला. राज्य चालवा अशी विनंती राजांनी समर्थकांना केल्याचं विधान केलं. ज्या व्यासपीठावर बागेश्‍वर बरळला त्याच व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत असे राज्यकर्ते विराजमान होते. कोणतंही बूड नसलेलं वक्तव्य आपल्या समोर होऊनही या दोन्ही नेत्यांनी बागेश्‍वरला रोखलं नाही की त्यांच्यापुढे खुलासाही केला नाही. ज्या बागेश्‍वरविषयी अंधश्रध्देच्या असंख्य तक्रारी देशभरातून येत असताना त्याच्या व्यासपीठावर या नेत्यांनी जाणं हेच खरं तर आक्षेपार्ह होतं. पण आजच्या राज्यकर्त्यांचं जग अशाच भोंदूंच्या दरबारी विसावल्याने त्यांच्यापुढे माथी बडवण्यात अर्थ नाही. यामुळेच अशोक खरातसारखे राज्यात निर्माण होऊ शकले. 

राज्यात अंधश्रध्दा विरोधी कायदा असताना अशा बाबांच्या व्यासपीठावर ही नेते मंडळी जातातच कशी? आपला दरबार अव्याहत सुरू रहावा यासाठी सत्ताधार्‍यांची भलामण करण्याची खासी पध्दत भोंदू बुवांच्या सांप्रदायाने अवलंबली आहे. त्याआड वादग्रस्त विधानं करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचे उद्योग हे गेल्या काही वर्षांपासून अव्याहत सुरू आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी छत्रपतींना ओढावं हे अती झालं. शिवाजी महाराज ही या राज्याची आणि राज्यातल्या प्रत्येकाची अस्मिता मानली जाते. असा राजा झाला नाही, होणं नाही, हे मान्य करणार्‍या जगाला आणि जागतिक इतिहासकारांना खोटं पाडण्यासाठी सुरू असलेला आटापिटा आणि त्यांचं समर्थन करणार्‍यांची करावी तितकी किव कमीच. छत्रपतींविषयी चाड असलेला कोणीही बागेश्‍वरच्या समोरच त्याचा पानउतारा केल्याविना राहिला नसता. दुर्देवाने तितका ताठरपणा या नेत्यांमध्ये नाही. बागेश्‍वरच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात उसळलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी केलेला खुलासा म्हणजे तू मार मी रडतो, अशाच धाटणीचा होता.

सत्ताधार्‍यांच्या मनात छत्रपतींविषयीची अढी आजवर लपून राहिलेली नाही. शिवरायांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची आणि आगलावी वक्तव्यं करणार्‍यांना वाचवण्याचे सत्तेने केलेले प्रयत्न उघड असताना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री योगी आळंदीला येतो, शिवरायांविषयी तारे तोडतो, त्याचं सरकारला काही वाटत नाही? योगी पुन्हा रामदासांचा दाखला देतात. छत्रपतींचं महत्व आणि त्यांचं अस्तित्व हे ब्राह्मणशाहीमुळेच होतं, असं सांगण्याचा हा अट्टाहास होय. महाराज हे रामदासांमुळे घडल्याचे कोणतेही पुरावे दस्तावेजात नाहीत. ज्याचा संबंध नाही त्याविषयी परराज्याचा एक मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन वक्तव्यं करत असेल तर ते या सरकाला लांच्छन होय. कोणीही यावं आणि टपली मारून जावं, असा हा प्रकार होय, जो अनेकदा घडला.

राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तर आपल्या वयाप्रमाणे वाचाळपणा केला. समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं विचारणार्‍या कोश्यारीने शिवप्रेमींच्या लाखोल्या खाल्ल्या. कॉ. पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेवर आक्षेप घेणार्‍यांना कोश्यारीने केलेला महाराजांचा एकेरी उल्लेख दिसला नाही? छत्रपतींचं महत्व कमी दाखवल्याशिवाय ब्राह्मणशाहीचं महत्व अधोरेखित होणार नाही, असं वाटणारेच शिवरायांविषयी आग ओकण्याचे उद्योग करत आहेत. त्यात बहुजनांची माथी आपापसातील भेदाने फिरली असल्याने त्यांना याचं काहीच वाटत नाही. कोरटकर, गायकवाडसारख्या अर्धवटांकडे दुर्लक्ष करण्याचे सल्ले देतात त्यांना यामागचा कुटील डाव कळत नाही. बहुजनांच्या या दुहीचा फायदा घेत शिवरायांचे मारेकरी त्यांचा इतिहास पुसून टाकतील, ही खरी भीती आहे. त्यांना सरकारचा पाठिंबा असल्याने हे घडणारच नाही, असं सांगता येत नाही.

ज्या रामदासांविषयी सत्ताधार्‍यांना पुळका आहे, त्या रामदासांनी कायम ब्राह्मणशाहीला महत्व दिल्याचे असंख्य दाखले इतिहासात सापडतात. ‘गुरू तो सकळांसी ब्राह्मण, जरी तो जाला क्रियाहीन’ ब्रह्मण जो कितीही वाह्यात असला तरी त्याला गुरू मानायचं, ही शिकवण ज्या रामदासांनी दिली ते छत्रपतींचे गुरू होऊ शकतात, यावर कोणी का विश्‍वास ठेवावा? कसेही असले तरी ब्राह्मणच गुरू असल्याचं सांगणारे इतरांचं श्रेष्ठत्व मान्य करतील यावर कोणाचा विश्‍वास नाही. एकाही संत महत्म्यांनी परजातीचा वा धर्माचा दुष्वास केल्याचं आढळत नाही. माऊली ज्ञानेश्‍वर, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबा यांनीही ठराविक जात आणि धर्माच्या श्रेष्ठवाचे दावे आपल्या अभंगात केलेले आढळत नाहीत. तो अधिकार रामदास स्वामींना दिला कोणी? हे विचारण्याचा अधिकार समस्त शिवप्रेमींना जरूर आहे. समतावादी खरे की विषमता निर्माण करणारे खरे? विषमता पसरवणार्‍यांना सत्तेकडून प्रोत्साहन दिलं जात असल्याने असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. शिवरायांचं महत्व भाषणापुरतं मानायचं आणि त्यांची बदनामी करणार्‍यांचीही आडून भलामण करायची, हे उद्योग शिवप्रेमींना कळत नाहीत, असं ज्यांना वाटतं ते एकतर मूर्ख आहेत वा त्यांचा हेतूच कूट आहे. रामदासांना शिवरायांचे गुरू ठरवण्यासाठीचे पुरावे नसल्याने तशी वक्तव्यं करून वाद घालणं हे अधिक सोपं.

केशव गोसावी या रामदासांच्या शिष्याने दिवाकर गोसावी नावाच्या दुसर्‍या शिष्याला 4 एप्रिल 1672 रोजी पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज रामदासांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं होतं. महाराजांची रामदासांची ही पहिली भेट. महाराजांनी 1666 पर्यंत हिंदवी स्वराज्याचं कतृत्व गाजवलं होतं. हे बागेश्‍वर आणि स्वघोषित धर्मगुरू आनंद स्वरूप या भोंदूंना कळत नाही, असं नाही. त्यांच्या ते सोयीचं नाही.

स्वरूप याने तर लढाया पेशव्यांनी लढल्या आणि नाव शिवाजीचं झालं, असं वक्तव्यं करत आगीत तेल ओतलं. पेशवे ब्राह्मण असल्याने त्यांना उपेक्षित ठेवल्याचं हा भोंदू म्हणतो. ज्या पेशवाईची तारीफ तो करतो ती पेशवाई शिवशाहीनंतर चक्क शंभर वर्षांनंतर अवतरली, याचंही भान या भोंदूंना नाही. याआधी या भोंदूंनी साईबाबांवरही असेच आरोप केले. ते हिंदू नाहीत, असं सांगण्यापर्यंत त्याची मजल गेली. पुढे तर हे भोंदू स्वत:ला देवाचा अवतार मानू लागले. मुझफ्फरपूरमध्ये त्याच्याविरोधात गुन्हेही दाखल झाले. अशा गुन्हेगारांच्या व्यासपीठावर राज्यातल्या सत्ताधार्‍यांनी जावं, हे गंभीरच नव्हे तर अनुचित होय.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 332
प्रवीण पुरो रविवार विशेष विश्लेषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे बायपासवरील घुलेवाडी हद्दीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बुलेट आणि…

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.