Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुका संपताच सामान्यांच्या खिशावर दरोडा; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची अस्मानी वाढ!
महाराष्ट्र संवाद विशेष

निवडणुका संपताच सामान्यांच्या खिशावर दरोडा; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची अस्मानी वाढ!

निवडणुकांच्या काळात जनतेला दाखवलेली 'अच्छे दिन'ची स्वप्ने आता हवेत विरली असून, निकालांपूर्वीच सरकारने ही 'गॅस'बाँबची भेट जनतेला दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नवी दिल्ली :

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे आपले क्रूर धोरण पुन्हा एकदा राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला असून, १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि रेस्टॉरंट चालकांचे कंबरडे मोडले असून, ऐन उन्हाळ्यात महागाईची ही झळ जनतेला सोसावी लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढीचा फटका आता सामान्य कुटुंबाच्या हॉटेल आतील खाद्यपदार्थांना बसणार आहे.

नव्या दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ३०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही हे दर ३०२४ रुपयांच्या आसपास गेले असून कोलकात्यात तर सिलिंडरने ३२०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

निवडणुकांच्या काळात जनतेला दाखवलेली ‘अच्छे दिन’ची स्वप्ने आता हवेत विरली असून, निकालांपूर्वीच सरकारने ही ‘गॅस’बाँबची भेट जनतेला दिली आहे. जरी घरगुती सिलिंडरच्या दरात तूर्तास वाढ केली नसली, तरी त्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्ह असून व्यावसायिक गॅस महागल्याने बाहेरचे जेवण, नाश्ता आणि केटरिंग सेवांच्या दरात मोठी वाढ होणे अटळ आहे.

या दरवाढीचा सर्वाधिक फटका खाद्य उद्योगाला बसणार असून ढाबे आणि छोटे हॉटेल चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. गॅस दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढल्याने साहजिकच हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतीही वधारणार आहेत. परिणामी, महागाईचे हे अप्रत्यक्ष ओझे शेवटी सामान्य ग्राहकाच्याच माथी मारले जाणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर दाखवलेली मेहेरबानी संपवून सरकारने आता सर्वसामान्यांची आर्थिक गणिते उधळून लावली असून, ही दरवाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 364
गॅस दरवाढ महागाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.