Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काळी जादू आणि मृत्यूची भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक; आरोपी खरातला ४ मे पर्यंत पोलीस कोठडी
गुन्हेगारी

काळी जादू आणि मृत्यूची भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक; आरोपी खरातला ४ मे पर्यंत पोलीस कोठडी

जासूदवर करण्यात आलेल्या आरोपांचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एकाच दिशेने सुरू असून आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक

भोंदू कॅप्टन अशोक खरात याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. अवतार पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाला एक कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या अशोक खरातला न्यायालयाने चार मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

व्यवसाय जगभरात विस्तारण्याच्या इच्छेचा गैरफायदा घेत आरोपी खरातने एका व्यावसायिकाला १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले. आहे. आरोपीने फिर्यादीला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावले आणि तिथे बनावट साप दाखवून मृत्यूची भीती घातली. ही पूजा पूर्ण करण्यासाठी २१ देशांत जावे लागेल, अन्यथा नागदंश होऊन मृत्यू होईल, अशी भीती दाखवून आरोपीने फिर्यादीकडून मोठी रक्कम उकळली. इतकेच नव्हे तर ‘परिस शक्ती’ प्राप्त झाल्यावर व्यवसायात भरभराट होईल असे सांगून फिर्यादीची मर्सिडीज कार आणि तुर्कस्थानमधून महागडे फर्निचरही स्वतःच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप आहे.

न्यायालयात सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य मांडताना स्पष्ट केले की, ही केवळ आर्थिक फसवणूक नसून जादूटोण्याच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही प्रकार घडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत फिर्यादीने दिलेल्या वस्तू या स्वेच्छेने दिलेली ‘भेट’ असल्याचा दावा केला. तसेच एका कर्मचाऱ्याने अश्लील व्हिडीओ चित्रीत करून ते इतरांना पुरवल्याचा प्रतिवादही बचाव पक्षाने केला.

मात्र, तपास अधिकाऱ्यांनी बचाव पक्षाचे दावे खोडून काढत तपासाची दिशा स्पष्ट केली आणि आरोपीच्या कोठडीची मागणी लावून धरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी खरातला ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील नवव्या गुन्ह्यात आता एसआयटीकडून पुढील तपास केला जात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 308
पोलीस कोठडी भोंदू अशोक खरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे…

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.